मुंबई : काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी महसूल राज्य मंत्री शालिनीताई पाटील यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी मुंबईतील माहीम येथील राहत्या घरी निधन झाले. गेले काही दिवस त्या आजारी होत्या. त्या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी होत्या. शालिनीताई पाटील या बॅरिस्टर होत्या. (Shalinitai Patil passed away)
शालिनीताई पाटील यांनी महाराष्ट्रात राजकारणात आपली छाप पाडली होती. वसंतदादांशी विवाह झाल्यानंतर त्या राजकारणात सक्रिय झाल्या १९८० च्या दशकात काँग्रेस सरकारच्या काळात मंत्रीपद भूषवले होते. त्यांनी सांगली लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले होते. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदार संघातून १९९९ ते २००९ या काळात त्या आमदार म्हणून निवडून आल्या. त्यांच्यावर कोरेगाव तालुक्यातील मुळ गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. जिजाबाईंच्यावर सर्वप्रथम पहिला चरित्र ग्रंथ लिहिणाऱ्या त्या लेखिका होत्या. त्यांनी क्रांतीसेना महाराष्ट्र नावाने पक्षही काढला होता. (Shalinitai Patil passed away)