कोल्हापूर : प्रतिनिधी : तब्बल २७ सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे तपासून दहा लाख चोरुन नेणाऱ्या नोकराला पोलिसांनी ४८ तासात जेरबंद केले. या नोकराने सहा महिन्यापूर्वी नोकरी सोडली होती. पण मालक कुठे रक्कम ठेवतात याची माहिती असल्याने त्याने चोरीचा प्रयत्न केला होता. (Thief arrested)
सर्किट हाऊसच्या मागील बाजूस कारंडे मळ्यात राजू राम केसरी यांच्या घरात २९ मार्च रोजी दुपारी सव्वा चार ते साडेपाच या वेळेत त्यांच्या घरी चोरी झाली. चोरट्याने रोख नऊ लाख ८० हजार ५०० रुपये चोरुन नेले. या प्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. (Thief arrested)
या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक चेतन मसुगडे यांच्या तपास पथकाने सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिस अंमलदार शुभम संकपाळ आणि विशाल चौगुले यांनी घटनास्थळ परिसरातील २७ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. त्यामध्ये एका संशयित व्यक्तीचा परिसरात संचार दिसून आला. पोलिसांनी अधिक चौकशी केला असता राजू केसरी यांच्या दुकानातील गोविंदप्रसाद भवरलाल नायक (वय २३, रा. वीर छापरगांव, जि. चुरु, राजस्थान) याच्यावर संशय व्यक्त केला. पोलिसांनी त्याला दिल्लीजवळील गाझियाबादमधून ताब्यात घेतले. त्याने चोरीची कबुली दिली. (Thief arrested)
राजू केसरी यांच्या दुकानात संशयित गोविंदप्रसाद नायक काम करत होता. व्यवसाय आणि व्यापारातील रक्कम कुठे ठेवतात याची त्याला माहिती होती. दीपावलीनंतर नोव्हेंबर महिन्यात त्याने नोकरी सोडून तो गावाकडे गेला होता. तो आर्थिक अडचणीत असल्याने त्याने चोरीचा डाव रचला. तो राजस्थानहून कोल्हापूरात आला. त्याने केसरी यांच्या घराची रेकीही केली. केसरी यांच्या घरी कोणी नसल्याचे पाहून त्याने चोरी करुन नऊ लाख ८० हजार ५०० रुपये चोरुन नेले. पोलिसांनी संशयित गोविंदप्रसाद नायकला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीतील रक्कम हस्तगत केले. (Thief arrested)
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उप निरीक्षक चेतन मसुगटे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार शुभम संकपाळ, विशाल चौगुले, संदीप बेंद्रे, विजय इंगळे, सचिन पाटील, विलास किरोळकर, सागर माने, लखन पाटील, महेश खोत, संजय कुंभार, महेश पाटील, संजय पडवळ, अमित सर्जे, अरविंद पाटील, योगेश गोसावी, महेंद्र कोरवी, गजानन गुरव यांचा सहभाग होता. (Thief arrested)
हेही वाचा :
ट्रॅक्टर विहिरीत कोसळून आठ ठार