नवी दिल्ली : प्रतिनिधी : केंद्रीय संसदीय मंत्री किरेन रिजिजू यांनी बहुचर्चित वक्फ विधेयक लोकसभेत सादर केले. या विधेयकाला एनडीएतील भाजप बहुतांशी पक्षांनी पाठिंबा दिला..विरोधकांनी या विधेयकाला विरोध केला आहे. या विधेयकावर लोकसभेत चर्चेस सुरुवात झाली आहे. विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपकडून पूर्णपणे ताकद लावली जाणार आहे. (Waqf Bill)
दरम्यान, ‘कुंभमेळ्यातील मृतांची संख्या लपविण्यासाठी वक्फ विधेयक आणले,’ असा आरोप समाजवादी पक्षाचे अध्यक्ष, खासदार अखिलेश यादव यांनी केला.
अखिलेश यादव यांनी विधेयकावर बोलताना भाजपचा समाचार घेतला. वादग्रस्त वक्फ (दुरुस्ती) विधेयक सध्याच्या सरकारच्या अपयशांवरून लक्ष विचलित करण्यासाठी आणले गेले आहे, असे ते म्हणाले.
“हे विधेयक सुधारणांसाठी नाही तर या राजवटीच्या उणीवा आणि अपयशांवर पांघरूण घालण्यासाठी आणले गेले आहे,” असे यादव म्हणाले. सत्ताधारी पक्ष कायद्याचा वापर राजकीय हत्यार म्हणून करत असल्याचा आरोप केला.
वक्फ बिल मंजूर करण्यापूर्वी संसदीय समितीकडे पाठवण्यात आले होते. समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी हे विधेयक केंद्रीय मंत्रीमंडळाला सादर केले. संसदीय समितीतील विरोधी पक्षातील सदस्यांनी केलेल्या सूचना अमान्य करण्यात आल्या. केंद्रीय मंत्रीमंडळाने संसदीय समितीच्या अहवालाला मंजूरी दिल्यानंतर आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात वक्फ सुधारण विधेयक सादर करण्यात आले आहे. या विधेयकाला काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासून विरोध केला आहे. लोकसभेत या विधेयकावर चर्चा सुरू झाली असून विरोधी पक्षानी या विधेपकाला विरोध केला आहे तर भाजपने पाठिंबा दिला आहे. विधेयकावर जनता दल युनायटेड, तेलगू देसम, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. (Waqf Bill)
“हा देश जितका हिंदूंचा आहे तितकाच मुस्लिम समुदायाचाही आहे, यात काही शंका नाही. तथापि, मुस्लिम समुदायाचे आदर्श कोण असतील? मतांचा व्यापार करणारे लोक मुस्लिम समुदायाचे आदर्श असतील तर ते देशाला मान्य होणार नाही. आम्ही नम्रपणे सांगू इच्छितो की, मुस्लिम समुदायाचे आदर्श मौलाना अबुल कलाम आझाद, डॉ. एपीजे कलाम, अब्दुल हमीद, अशफाकुल्ला खान, रसखान, कबीर, मलिक मुहम्मद जायसी असतील. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी विकेट घेतो तेव्हा संपूर्ण देश आनंदाने उफाळून येतो. सानिया मिर्झा टेनिसमध्ये भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी करते तेव्हा सर्वजण तो क्षण साजरा करतात. आम्हाला वाटले होते की मतांची ‘सौदागिरी’ थांबेल, परंतु तसे झाले नाही.”
- भाजप खासदार रविशंकर प्रसाद
वफ्क बिलाला होणार विरोध लक्षात घेता लोकसभेत मंत्री किरण रिजिजू यांनी धार्मिक संस्थामध्ये सरकारचा हस्तक्षेप करण्याचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, “सरकार सर्व धार्मिक संस्था आणि त्यांच्या स्वायत्तेचा सन्मान करत आहे. त्याच्या कामकाजात हस्तक्षेप केला जाणार नाही. वक्फ संशोधन विधेयक केवळ सुधारणेसाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी लोकसभेत सादर केले आहे. पण दुर्दव्य असे की काही लोक या विधेयकाच्या उद्देशावरुन संभ्रम निर्माण करत आहेत”. युपीए सरकारने वक्फ विधेयक काही बदल केले होते याकडे लक्ष वेधले. (Waqf Bill)
वक्फ विधेयक सादर केल्यानंतर किरण रिजिजू यांनी एक गोष्ट सांगितली. दिल्लीत १९७० पासून एक प्रकरण सुरू आहे. यामध्ये अनेक संपत्तीचा समावेश आहे. त्यामध्ये सी.जी.ओ. कॉम्प्लेक्स, संसद भवनाचाही समावेश आहे. ही सर्व संपत्ती वक्फ बोर्डाची आहे असा दावा दिल्ली वक्फ बोर्डने केला आहे. हे संशोधन आपण सभागृहात सादर केले नाही तर आपण ज्या संसदेत बसलो अहोत ती संपत्तीही वक्फ बोर्डाची ओळखली जाईल. जर मोदी सरकार सत्तेवर आले नसते तर अनेक संपत्ती चुकीच्या पद्धतीने नोंदणी झाली असती, असा दावाही रिजिजू यांनी केला. (Waqf Bill)
काँग्रेसचे खासदार के.सी. वेणुगोपाल यांनी वक्फ विधेयक सादर करण्यास सरकार गडबड करत आहे, या विधेयकावर संशोधन करण्यास पुरेसा वेळ दिला नाही, असा आरोप केला. ते म्हणाले, योग्य चर्चा विनिमय न करता हे विधेयक संसदेत सादर केले आहे. या विधेयकावर संशोधन करण्यस वेळ दण्याची गरज होती पण तो वेळ दिला नाही. काँग्रेसचे खासदार गौरव गोगई यांनी वक्फ सुधारणा विधेयक हे संविधान विरोधी आहे असा आरोप केला. (Waqf Bill)
हेही वाचा :