कोल्हापूर : प्रतिनिधी : भाऊबिजच्या आधी दोन दिवस बाजारात खरेदी करुन गावी परतणाऱ्या मोटारसायकला टेंपोने दिलेल्या धडकेत भाऊ बहिणीसह तिघांचा मृत्यू झाला. श्रीकांत कांबळे (वय ३०, रा. तरसंबळे, ता. राधानगरी) दीपाली गुरुनाथ कांबळे (२८, रा. शेंडूर, ता. कागल), शिवज्ञा सचिन कांबळे (वय ३) अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. अथर्व गुरुनाथ कांबळे (वय १०) हा जखमी असून त्याच्यावर सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. राधानगरी तालुक्यातील कौलव गावाजवळ बुवाचा ओढा या ठिकाणी आज मुंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. राधानगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Accident near Kaulav)
अपघातासंदर्भात कांबळे यांच्या नातेवाईकांकडून माहिती मिळाली. श्रीकांत कांबळे दीपावलीची खरेदी करण्यासाठी बहिण दीपाली, भाचा अथर्व आणि पुतण्या सचिन याला घेऊन गेले होते. भोगावतीहून खरेदी करुन ते तरसंबळे गावाकडे परतत होते. कौलव गावाजवळ दत्त मंदिराजजवळ कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या आयशर टेम्पोने जोरदार धडक दिली. या धडकेत श्रीकांत कांबळे, दीपाली कांबळे आणि शिवज्ञा कांबळे याचा जागीच मृत्यू झाला. अपघातस्थळी शेतात भात काम करणाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावातील तरुणांनी जखमी अथर्व कांबळेला रुग्णवाहिकेतून कोल्हापुरात सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारास पाठवले. त्याच्यावर सीपीआरमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. (Accident near Kaulav)
दीपालीच्या पतीचे काही दिवसापूर्वी निधन
दीपालीचा विवाह २०११ मध्ये झाला. काही दिवसापूर्वी तिच्या पतीचे निधन झाले होते. दहा वर्षाच्या अथर्वला घेऊन दीपाली माहेरी दीपावलीसाठी माहेरी आली होती. चार वर्षापूर्वी शेंडूर येथे अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करत हेती. पतीच्या निधनानंतर मोठ्या संघर्षातून कुटुंबाला आधार देण्याचे काम ती करत होते. पण तिच्यासह भाऊ, भावाचा मुलगा या तिघांचा मृत्यू झाल्याने तरसंबळे गावावर शोककळा पसरली आहे. (Accident near Kaulav)