कन्नूर : (केरळ) : तब्बल १९ वर्षानंतर एका खुनाच्या गुन्ह्यात केरळमधील थलसरी ॲडशिनल सेशन कोर्टाचे जज्ज रुबी के. जोस राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या नऊ स्वयंसेवकांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. २००५ मध्ये केरळमधील कन्नापूरम गावात सीपीआय (एम) चा कार्यकर्ता रिजिथ शंकरन याची हत्या केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.(DYFI activist’s murder)
व्ही. व्ही. सुधाकरन (वय ५७), के.टी. जयेश (४१), सी.डी. रणजीत (४४), पी.पी. अजिंदरन (५१), आय.व्ही. अनिल (५२), पी.पी. राजेश (४६), व्ही. व्ही. श्रीजीत (४३) आणि टी.व्ही. भास्करन (६७) अशी शिक्षा झालेल्या आरएसएस स्वयंसेवकांची नावे आहेत. या गुन्ह्यात दहा आरोपी होते. त्यापैकी अजेश याचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. (DYFI activist’s murder)
आरएसएसच्या स्वयंसेवकांच्या हल्ल्यात रिजिथ शंकरन याचा मृत्यू झाला होता. रिजिथ सीपीआय (एम) चा कार्यकर्ता होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी यांच्यात वाद सुरू होता. ३ ऑक्टोबर २००५ रोजी रिजिथ सायंकाळी मित्रांसमवेत घरी चालत निघाला होता. त्यांच्यासोबत के. व्ही. निकेश, आर. एस. विकास आणि के. एन. वमल हे तीन मित्र होते. थाचनकंडी देवालयाजवळ दबा धरुन बसलेल्या आरएसएस स्वयंसेवकांच्या जमावाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. त्यांच्या हातात शस्त्रे होती. त्यांनी रिजिथ आणि त्यांच्या मित्रांवर हल्ला चढवला. धारदार शस्त्राने भोसकल्याने रिजिथ गंभीर जखमी झाला. त्याचे इतर मित्रही जखमी झाले. गंभीर दुखापतीमध्ये रिजिथ शंकरनचा मृत्यू झाला. (DYFI activist’s murder)
रिजथचा मित्र निकेश याने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. थाचनकंडी मंदिराजवळ आरएसएस शाखा स्थापन करण्यावरुन सीपीएम आणि आरएसएस कार्यकर्त्यांत वाद झाला होता. पोलिसांनी आरएसएसच्या नऊ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केली. वलपट्टनमचे सर्कल इन्स्पेक्टर टी. पी. प्रेमराजन यांनी या गुन्ह्याचा तपास करुन आरोपपत्र दाखल केले. खटल्याची सुनावणी होऊन थिलासरी न्यायालयाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नऊ जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. यावेळी कोर्टात रिजिथ शंकरनची आई जानकी, बहीण पूजा उपस्थित होत्या.