स्टार प्रवाहने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये जुई म्हणते, दरवर्षी असं काहीतरी घडतं की तिला कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनासाठी जाण्याचा योग येतो. या काळात मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी असते. एका वर्षी अशीच एक घटना घडली. ती मी कधीच विसरू शकत नाही. मला तेव्हा सगळे सांगत होते की नवरात्रीमध्ये तिकडे जाऊ नको. कारण खूप गर्दी असते. तरीही मी गेले. तिथे एक गुरुजी आले. मला म्हणाले की, दर्शन घ्यायचंय ना? मी हो म्हणाले.’
ती व्यक्ती तिला देवळात घेऊन गेली. जुईला त्यांनी गाभाऱ्याजवळ उभं केलं. जुई सांगते, ‘मी तिथे उभी राहिले तेव्हा प्रसादाचे पाणी शिंपडले जात होते. मला त्यांनी सांगितलं की तोंड उघडून उभी राहा. मी उभी राहिले, त्यानंतर मागे वळून पाहिले तेव्हा तिथे ते गुरुजी नव्हते.’ नेमके त्या क्षणाला मंदिरात घेऊन जाणारे ते गुरुजी कोण होते, हाच विचार जुईच्या मनात आला. (Jui Gadkari)
जुईने पुढे म्हटले आहे की, ‘गाभाएऱ्यातील गुरुजी प्रसादाचे पाणी उडवत होते, त्यांनी मला बरोबर त्यावेळीच तिथे आणले आणि दर्शन झालं. मला वाटलं की खुद्द देवीनेच मला आतमध्ये बोलावून घेतलं आणि तो प्रसाद दिला. त्यामुळे माझा तिच्यावर भयंकर विश्वास आहे.’