जयपूरः राजस्थान आणि मध्य प्रदेशसह देशातील चार राज्यांतील अनेक जिल्ह्यांमध्ये दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. जयपूरमध्ये दिवसाही धुके दिसून येत होते. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर खैरथळ-तिजारा जिल्ह्यातील सरकारी व खासगी शाळांना २३ नोव्हेंबरपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मध्य प्रदेशमध्ये भोपाळ-इंदूरसह २८ शहरांमध्ये तापमान सामान्यपेक्षा कमी झाले आहे. दिल्ली, पंजाब आणि चंदीगड या उत्तर भारतातील राज्यांमध्ये प्रदूषण वाढले आहे. पंजाबमध्ये असे ५ जिल्हे आहेत, जिथे प्रदूषण पातळी सामान्यपेक्षा चारपट जास्त आहे. दिल्ली आणि हरियाणातील अनेक शाळा ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. (Air pollution)
Tag: