नवी दिल्ली : पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये एका मशिदीत झालेल्या स्फोटात २४ जणांचा मृत्यू झाला. राजधानीतील तरलाई भागातल्या इमाम बाराहगह खदीजत उल कुबरा या ठिकाणी स्फोटांची घटना घडली. घटनास्थळी पोलिस आणि बचाव पथकाने काम सुरू केले आहे. या स्फोटानंतर इमर्जन्सी लागू करण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणांनी इमाम बारागाह आणि आसपासच्या भागात बंदोबस्त वाढवला आहे. (24 people died in the explosion in Islamabad)
इमाम बारगाह या ठिकाणी शुक्रवारच्या नमाजपठणासाठी मोठी गर्दी होती. त्यावेळी आत्महातकी हल्लेखोराने स्वत:ला उडवले आणि स्फोट घडवला. सुरवातीला पाच जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. आता मृतांची संख्या २४ वर पोहोचली आहे. स्फोट इतका भयंकर होता त्यामध्ये १०० हून अधिक लोक जखमी झाले. रक्तबंबाळ अवस्थेतील लोक परिसरात पहायला मिळाले. (24 people died in the explosion in Islamabad)
स्फोटाचा निषेध पाकिस्तानमधील सर्व राजकीय पक्षांनी केला आहे. पाकिस्तानचे संसदीय मंत्री तारिक फजल यांनी एक्स पोस्टवर स्फोटाची माहिती दिली. या भ्याड हल्ल्यामुळे झालेल्या जीवितहानीबाबत मी दुःख व्यक्त करतो. शोकाकुल कुटुंबाप्रती माझ्या संवेदना आहेत. जखमींची प्रकृती सुधारावी, यासाठी मी प्रार्थना करतो. परंतु, दहशतवादाची अशी कृत्ये राष्ट्राचे मनोधैर्य खच्ची करू शकत नाहीत. शांतता, सहिष्णुता आणि स्थिरतेसाठी आपण सर्वांनी एकजूट राहणे आणि कायदा अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना पाठिंबा देणे ही काळाची गरज आहे, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. (24 people died in the explosion in Islamabad)