महाराष्ट्र दिनमान ऑनलाइन डेस्क : दक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth Health) यांना काल (दि.३०) मध्यरात्री पोट दुखीमुळे चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांचे हेल्थ अपडेट समोर आले आहेत. डॉक्टरांनी स्वतः रजनीकांत यांच्या आताच्या परिस्थितीची माहिती दिली. त्यांच्या पोटाच्या खालच्या भागाजवळ स्टेंट टाकण्यात आला. कॅथ लॅबमध्ये तीन विशेष डॉक्टरांच्या पथकाने ही यशस्वीरित्या निवडक प्रक्रिया पार पाडली आहे. या दरम्यान सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
रजनीकांत यांना रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंता वाढली आहे. परंतु, त्यांची पत्नी लता रजनीकांत यांनी रजनीकांत यांची तब्बेत बरी असल्याच सांगितलं. पोटदुखीच्या शस्त्रक्रियेमुळे रजनीकांत यांना आणखी २ ते ३ दिवस रुग्णालयातच ठेवणार असल्याच डॉक्टरांनी सांगितलं.
पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, आता त्यांची प्रकृती चांगली असल्याचे सांगण्यात येत आहे. या बातमीने त्यांच्या चाहत्यांना थोडा दिलासा मिळाला आहे आणि ते सोशल मीडियावर त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी आणि घरी परतण्यासाठी शुभेच्छा आणि प्रार्थना करत आहेत. (Rajinikanth Health)
#WATCH | Chennai, Tamil Nadu: Visuals from outside the Apollo hospitals where Actor Rajinikanth was rushed to on Monday late night night.
Hospital sources have confirmed that Rajinikanth’s condition is stable. He was taken to the hospital after complaining of severe stomach… pic.twitter.com/t6xHSs2iur
— ANI (@ANI) October 1, 2024
हेही वाचा :