बीड : वरिष्ठ पोलिस अधिकारी जालिंदर सुपेकर यांनी तरुंगातील कैद्यांकडून ३०० कोटी रुपयांची मागणी केल्याची तक्रार आपल्यापर्यंत आली आहे, असा दावा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला. वैष्णवी हवगणे आत्महत्येपूर्वी सुपेकर हे विशेष महानिरीक्षक (कारागृह) या पदावर कार्यरत आहेत. हगवणे कुटुंबाशी सुपेकर यांचे संबध आल्याने गृहखात्यांने त्यांची पदावनती करुन उप महासमादेशक होमगार्ड पदावर बदली करण्यात आली आहे. (Dhas criticized Supekar)
सुपेकर हे हगवणे यांचे नातेवाईक असून ते पुण्यात पोलिस अधिकारी असताना त्यांनी हगवणे बंधूंना अवैध पद्धतीने शस्त्र परवाना दिला होता. वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पण हगवणे यांच्यावर कारवाई होऊ नये म्हणून त्यांनी हस्तक्षेप केला होता. त्यामुळे सुपेकर यांची पदावनती करण्यात आली आहे. (Dhas criticized Supekar)
एका बैठकीत आमदार सुरेश धस म्हणाले, आयजी पोस्टवर असलेला माणूस एक लाख रुपये घेतो आणि ५० हजारचा मोबाईल घेतो हे दुर्दैव आहे. सुपेकरबाबत माझ्याकडे तक्रारी आल्या आहेत. जेलमध्ये आरोपींकडून ३०० कोटी रुपये मागितल्याची तक्रार माझ्याकडे आली आहे. नातेवाईकाच्या सुनेकडून पैसे मागतात याचा अर्थ सुपेकर हे शंभर टक्के फॉल्टी आहेत. (Dhas criticized Supekar)
हगवणे यांच्याकडे १५० कोटी रुपये मालमत्ता असली तरी या प्रापर्टीचा आता काय उपयोग. असे लोक तुरुंगातून कितीही वर्षांनी बाहेर आले तरी लोकांनी त्यांच्यावर शेण फेकले पाहिजे, असेही आमदार धस म्हणाले.
हेही वाचा :
मंत्री महाजनांच्या कार्यालयात ३०० फायली पडून