महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : राज्याच्या अनेक भागांत कमी अधिक प्रमाणात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. याचा सर्वात जास्त फटका शेत पिकांना बसला आहे. हाताशी आलेली पिके शेतात असून पावसाच्या विश्रांतीकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.त्यात आजपासून राज्याच्या विविध भागांत पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डंख यांनी दिला आहे. (Retreating Monsoon)
९ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबरपर्यंत राज्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. सोयाबीन, उडीद व भात या काढणीला आलेल्या पिकाला याचा फटका बसू शकतो. पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार आजपासून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या भागात रोज भाग बदलत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर १२ ऑक्टोबरपासून विदर्भात पावसाला सुरुवात होणार असल्याचे डख म्हणाले. १२ ते १६ ऑक्टोबर या काळात विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.नांदेड, परभणी,हिंगोली, लातूर, बीड, जालना या सहा जिल्ह्यांमध्ये जास्त पावसाची शक्यता आहे. तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यातही पावसाचा जोर अधिक राहणार असल्याची शक्यता आहे. (Retreating Monsoon)
परतीचा पाऊस वरदान
परतीचा पाऊस हा गहू आणि हरभरा पिकांसाठी वरदान ठरणार आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला परतीच्या पावसाची अनेक ठिकाणी शेती पिकांना मोठा फटका बसत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सोयाबीन, उडीद, भाजीपाला, तूर, कांदा या पिकांचं नुकसान झालं आहे तसेच उद्याच्या पावसाच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी.असा सल्ला दिला आहे.
हेही वाचा :