महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भाजपने एक्झिट पोलचे अंदाज फोल ठरवत सलग तिसऱ्यांदा हरियाणा मध्ये सत्ता आणली आहे. हरियाणात काँग्रेस सत्ता स्थापन करेल असे अंदाज वर्तवण्यात आले होते. यानंतर काँग्रेसच्या कार्यालयात सेलिब्रेशन करण्यात आलं होतं. काँग्रेस कार्यकर्त्यांनी ढोल वाजवत आणि जिलेबी भरवत आधीच विजय साजरा करण्यास सुरुवात केली होती. पण दिवस पुढे गेला तशी भाजपाने आघाडी घेतली. यानंतर सोशल मीडियावर ‘जिलेबी’ ट्रेंड होऊ लागली आणि भाजपाने काँग्रेसला डिवचण्यासाठी त्याचा वापर सुरु केला. (Haryana Election)
भाजपाला ४८ जागा मिळाल्या असून काँग्रेसने ३७ जागा जिंकल्या आहेत. हरियाणामधील अनपेक्षित विजयानंतर भाजपा समर्थकांनी राहुल गांधींना जिलेबीच्या नावे ट्रोल करण्यास सुरुवात केलं आहे.काही भाजपच्या नेत्यांनी जिलेबी खातानाचे फोटो पोस्ट केले. आसाम भाजपच्या एका सदस्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पक्षाचा एक कार्यकर्ता हातात पाकिट घेऊन लखीमपूर येथील काँग्रेस कार्यालयात जाताना दिसत आहेत.
भाजपाने काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या दिल्लीमधील निवासस्थानी एक किलो जिलेबी पाठवली आहे. दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमधील बिकानेरवाला येथून राहुल गांधीच्या अकबर रोडवरील घऱी ही जिलेबी पाठवण्यात आली आहे. स्क्रीनशॉटमध्ये जिलेबीची ऑर्डर दिल्याचं दिसत असून, यावेळी कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय निवडण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘हरियाणातील भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने राहुल गांधींच्या घऱी जिलेबी पाठवण्यात आली आहे’.
जिलेबीचा ट्रेंड….
“मी जिलेबी खाल्ली आणि माझी बहीण प्रियांकाला मेसेज केला की आज मी माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम जिलेबी खाल्ली आहे. मी तुमच्यासाठीही जिलेबीचा डबा घेऊन येत आहे,” असं राहुल गांधी म्हणाले होते. हरियाणातील एका स्थानिक दुकानातील जिलेबीची जागतिक स्तरावर निर्यात केली जावी, असं सुचवणाऱ्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना भाजपा नेत्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा :