पाटणा : बिहार : ‘सलूनवाल्याच्या उकिरड्यात काय मिळणार… केसच!,’ अशी म्हण आहे. सर्वसामान्यांच्यादृष्टीने कापलेले केस निरुपयोगी असतात. पण हल्लीच्या युगात माणसाच्या डोक्यावरील केसांना सोन्याची किंमत आली आहे. भारत-नेपाळ सीमेवर ८० लाख रुपये किमतीचे केस पकडण्यात आले. या प्रकरणात तिघा तस्करांना अटक केली. ट्रकमधून १६८० किलो केस जप्त केले आहेत. बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील मधवापूर सीमेवर ही कारवाई करण्यात आली. (hair-smuggling)
डीआरआईने ऑपेरशन करुन ही कारवाई केली. नेपाळ सीमेवर एक ट्रक जप्त केला. ट्रकमध्ये सापडलेल्या केसांची किंमत अंदाजे ८० लाख रुपये आहे. ते नेपाळमार्गे चीनमध्ये तस्करी करुन पाठवले जाणार होते. चीनमध्ये या केसापासून विग तयार केले केले जात. पुष्पा चित्रपटाप्रमाणे केसांचा ट्रक एका तळघरात लपवण्यात आला होता.(hair-smuggling)
जप्त केलेल्या केसांचे वजन १६६० किलो ग्रॅम आहे. हे केस तिरुपतीवरुन जमा केले होते. तस्करीतील गुन्हेगार जमा केलेले केस एकत्र करुन चीनला पाठवतात. भारतातील केसांना चीनमध्ये मोठी मागणी आहे. भारतीय केसांपासून तयार केलेल्या विगला मोठी किंमत मिळते. कारण ते विग मजबूत आणि टिकाऊ असतात. यासाठी तस्कर मोठ्या प्रमाणात तस्करी करतात.(hair-smuggling)
‘डीआरआई’ला मिळाली टीप
बंगाल आणि बिहारमधून मानवी केस चीनला जात आहेत, अशी टीप डीआरआईला मिळाली होती. त्याआधारे डीआरआईने मधवापूर सीमेवर तस्करीचा ट्रक आला होता. लपवून ठेवलेल्या या ट्रकमध्ये मोठ्या संख्येने केस सापडले. तीन तस्कारांना अटक केली आहे.
हेही वाचा :