कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध संघ अर्थात ‘गोकुळ’ च्या वार्षिक सभेविषयी प्रचंड उत्सुकता होती. या सभेत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तथापि, ही ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी (९ सप्टेबर) मोठ्या उत्साहात पार पडली. संघाचे अध्यक्ष नावीद मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. (Gokul general meeting)
दूध संघ २० लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा लवकरच पार करेल. तसेच गोकुळ ब्रँडचे आईस्क्रिमही लवकरच बाजारात आणू, अशी घोषणा अध्यक्ष नावीद मुश्रीफ यांनी केली. त्याचवेळी नवीन दही प्लँट १ ऑक्टोबरपासून सुरू करण्याच्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. नवी बटर मेकिंग यंत्रणाही लवकरच सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.(Gokul general meeting)
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील हे या सभेवेळी प्रमुख उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीपासूनच समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केल्यामुळे तणावपूर्ण स्थिती होती.(Gokul general meeting)
यावेळी संघाचे २५ लाख लिटर संकलनाचा संकल्पही यावेळी करण्यात आला.
संघाच्या गतवर्षीचा आढावाही या सभेत घेण्यात आला. मार्च २०२४ अखेर ३ हजार ६७० कोटी रुपये इतकी झाली असून, मार्च २०२५ अखेर ती ३ हजार ९६६ कोटी रुपयांपर्यंत गेल्याचे यावेळी सांगण्यात आले. विशेष म्हणजे २९६ कोटी रुपयांनी वाढ नोंदली आहे. संघाचे भाग भांडवलही वाढले आहे. ते आता ७७ कोटी ९८ लाख इतके झाले आहे. १ कोटी ७४ लाखांची वाढ यामध्ये झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.