महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानचे एकदिवसीय आणि टी-२० संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी आज सोमवारी (दि.२८) आपल्या पदाचा राजीनामा दिला. कर्स्टन यांनी याच वर्षी मे महिन्यात पाकिस्तानच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतली होती. सहा महिन्यातच त्यांनी राजीनामाही दिल्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे. गॅरी कर्स्टन यांच्या नेतृत्वाखाली भारताने २०११ चा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. (Gary Kirsten)
पीसीबीशी कर्स्टन यांचे मतभेद
पाकिस्तान क्रिकेटशी मतभेद झाल्यानंतर कर्स्टन यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पीसीबीने संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरा यांच्याशी संवाद न साधला संघाचा कर्णधार बदलला. त्यामुळे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन नाराज होते. पाकिस्तानचे कसोटी प्रशिक्षक जेसन गिलेस्पी यांनी तर सांगितले होते की, त्यांची भूमिका केवळ सामना विश्लेषकांपुरतीच मर्यादित आहे. असे करण्यासाठी गॅरी यांनी करारावर स्वाक्षरी केलेली नाही. कर्स्टन यांनी या प्रकरणावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
रिजवानला कर्णधार करताना विचारलेही नाही
मोहम्मद रिझवानला पाकिस्तानचा नवा पांढऱ्या चेंडूचा कर्णधार बनवण्यात आला तेव्हाही कर्स्टन यांना कोणतीही माहिती दिली नव्हती. कर्स्टन पाकिस्तानात नसताना रिजवानला अधिकृत कर्णधार बनवण्याची घोषणाही पत्रकार परिषदेत करण्यात आली होती. (Gary Kirsten)
हेही वाचा :