सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी (ता. माळशिरस) हे गाव इव्हीएम विरोधातील आंदोलनाचे प्रेरणास्थान बनले आहे. विधानसभा निवडणुकीत इव्हीएमद्वारे मतदानामध्ये घोळ झाल्याचा राज्यभरातील लोकांचा संशय आहे. परंतु मारकडवाडी ग्रामस्थांनी लोकशाही मार्गाने केलेल्या कृतीला देशव्यापी आंदोलनाचे स्वरुप प्राप्त झाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद्चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या गावाला भेट देऊन ग्रामस्थांच्या मागणीला समर्थन दिले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हेही इथून आंदोलनाची सुरुवात करणार आहेत. लोकशाहीमध्ये एखाद्या प्रक्रियेविषयी लोकांना शंका असेल तर ती तशीच रेटून नेणे लोकशाहीविरोधी आहे. देश किंवा राज्याचे सरकार ठरवणा-या निवडणुका पारदर्शी आणि निष्पक्ष व्हायच्या असतील, त्यावरील लोकांचा विश्वास बळकट व्हायचा असेल तर मतपत्रिकेद्वारे मतदानाची मागणी मान्य व्हायला हवी.
EVM
लोकशाही देशांमध्ये बॅलेट पेपरवर मतदान होते मग भारतात का नाही? : शरद पवार
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभेत महायुतील मोठा विजय मिळाला. तर महाविकास आघाडीला ५० जागाही जिंकता आल्या नाहीत. ईव्हीएम मतदान प्रक्रिकेला आव्हान देत मारकडवाडीतील नागरिकांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला. परंतु, प्रशासनाने गावात मोठा पोलिस फौजफाटा लावून ही प्रक्रिया रद्द करण्यास गावकऱ्यांना भाग पाडले. यानंतर आज (दि.८) शरद पवार यांनी मारकडवाडी गावाला भेट दिली. यावेळी ते ईव्हीएम हटाव, देश बचाव या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी बोलताना शरद पवार यांनी ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करत पाश्चिमात्य देशांमध्ये बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेतल्या जात असतील तर भारतातही बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी केली (Sharad Pawar News)
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, मारकडवाडीतील नागरिकांना बॅलेट पेपरवर मतदान करायचे आहे. अशी भूमिका घेतल्यावर त्यांच्यालवर गुन्हे दाखल करण्यात आले. हे आश्चर्यकारक आहे. तुम्ही माझ्याकडे ज्या तक्रारी केल्या आहेत, त्या आम्ही निवडणूक आयोग आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे पाठवू, असा विश्वास त्यांनी नागरिकांना दिला. यावेळी ईव्हीएमवर निवडणूक नको, ती मतपत्रिकेवर व्हावी, असा ठराव देखील एकमताने करण्यात आला.
शरद पवार म्हणाले की, “निवडणुका होत असतात. यात काही लोकांचा विजय होतो. तर, काहींना पराभवाला सामोरे जावे लागते. परंतु महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीबद्दल लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे.
बॅलेट पेपरवर निवडणुका का नाही? : शरद पवार
जगात अमेरिका, इंग्लंड अशा अनेक देशात बॅलेट पेपरवर निवडणुका होतात. जर संपूर्ण जगभरात निवडणुका बॅलेट पेपरवर होत आहेत. तर आपल्या अशा पद्घतीने निवडणुका का होत नाहीत? असा शरद पवार यांनी उपस्थित केला. (Sharad Pawar News)
तर का घाबरता : जितेंद्र आव्हाड
मारकवाडी येथे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, हा कार्यक्रम मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी आयोजित केला आहे. तुमचा लोकशाहीवर विश्वास आहे. तर, तुम्ही त्यांना बॅलेट पेपरवर मतदान करण्यास का रोखत आहात. त्यांना जर बॅलेट पेपरवर मतदान करायचे असल्यास त्यांना करू द्या. त्यात हस्तक्षेप करून त्यांच्यार गुन्हे नोंद करण्याची काय गरज आहे. तुम्ही यांना घाबरलात का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला केला.
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आदरणीय खासदार श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याच्या मारकडवाडी या गावातून EVM हटाओ, संविधान और देश बचाओ आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी गावकऱ्यांशी संवाद… pic.twitter.com/ugbwJQllcm
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) December 8, 2024
हेही वाचा :
मुंबई, विशेष प्रतिनिधी : महायुतीला इतके मोठे बहुमत मिळाले आहे की, आता ईव्हीएमचा विषय काढून महाविकास आघाडी रडीचा डाव खेळत आहे, असा थेट हल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (दि.७) माध्यमांशी बोलताना केला. (Ajit Pawar)
तीन दिवसाच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. नवनिर्वाचित सदस्यांना शपथविधी हंगामी विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात येत आहे. यावेळी सभागृहात जाताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, आम्ही महाविकास आघाडीमध्ये काम केले आहे. त्यामुळे ईव्हीएम मशीनला दोष देण्यात काहीच अर्थ नाही.
लोकसभेला ईव्हीएमने ३१ जागा महाविकास आघाडीला दिल्या. त्यावेळी ईव्हीएम मशीन खूप चांगली होती. मात्र, विधानसभेत महायुतीच्या बाजुने जनतेने कौल दिला तर, ईव्हीएमला दोष द्यायला मविआने सुरुवात केली आहे. लोकशाहीत प्रत्येकाला वक्तव्य करण्याचा अधिकार आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांना शपथ घेण्याचा उद्याचा (दि.८) दिवस आहे. त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल. तरच त्यांना सोमवारी (दि.९) कामकाजात सहभागी होता येणार आहे. याबाबतची माहिती सर्वांना आहे. परंतु, पहिल्याच दिवशी आम्ही संख्येने कमी असलो तरी आम्ही काही वेगळ करतोय. त्यांचे अस्तित्व दाखवण्याचा केविलवाणा प्रकार सुरू आहे, असा टोलाही त्यांनी केला. (Ajit Pawar)
सुरुवातीला महाविकास आघाडीचे आमदार शपथविधीसाठी सभागृहात बसले होते. मात्र, काही वेळाने ते सर्व बाहेर निघून गेले. इतकी वर्षे मी त्यांच्यासोबत होतो तेव्हा मी चांगला होतो. मी कुणासोबत उपमुख्यमंत्री म्हणून काम केले नाही ते सांगा. अशी विचारणा करत मी जर दोषी असतो किंवा भ्रष्टाचारी असतो. तर त्यांनी मला उपमुख्यमंत्री केलेच नसते. मात्र, सध्या ते राजकीय भूमिकेतून मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतू, मी योग्यठिकाणी न्याय मागत होतो आणि तो मला मिळाला आहे असेही अजित पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नांला उत्तर देताना स्पष्ट केले.
हेही वाचा :
मुंबईः विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने महाविकास आघाडीचा पराभव केला. महायुतीच्या विजयानंतर ‘ईव्हीएम’वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विरोधक टीका करत आहेत. ‘ईव्हीएम’च्या घोटाळ्यावरून आता महायुतीमधून बाहेर पडलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी खळबळजनक दावा केला आहे. ‘ईव्हीएम’मध्ये घोटाळा झाल्यामुळे महायुतीचा विजय झाला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. याचसोबत त्यांनी महायुतीमधून बाहेर पडण्यामागचे कारण सांगितले आहे.
जानकर यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. भाजप कोणाला मुख्यमंत्री करेल यात मला अजिबात पडायचे नाही; पण अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये घोटाळा झाल्यामुळे महायुतीच्या जागा निवडून आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. जानकर यांनी सांगितले, की ‘ईव्हीएम’वर माझा आक्षेप असून देशभरात ‘ईव्हीएम’विरोधात आंदोलन करणार आहे. ‘ईव्हीएम’मुळे देशाची लोकशाही धोक्यात आहे. ‘ईव्हीएम’ हॅक करता येते. मी स्वतः इंजिनीअर आहे. त्यामुळे मला सगळे माहिती आहे. सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोग सगळे त्यांचे आहेत. त्यामुळे याला लोकशाही म्हणता येणार नाही, अशी टीका त्यांनी केली.
महायुतीमधून बाहेर पडण्यामागचे कारण सांगताना जानकर म्हणाले, की मला महायुतीचा अनुभव खूप वाईट आला आहे. त्यामुळे मी त्यांच्यातून बाहेर आलो आहे. काँग्रेसला अजून चाखले नाही. त्यामुळे त्यांच्याकडे न जाता स्वतंत्र पुढे जायची आमची भूमिका आहे. त्यामुळे येत्या काळात आमची वाटचाल ‘एकला चलो’ची असेल. ‘माझ्या पक्षाचा राज्यात सध्या एकच आमदार आहे. कोणासोबत जायचे याचा अजून निर्णय झालेला नाही; पण जर त्या आमदाराने पक्षाला न विचारता काही निर्णय घेतला, तर त्यावर नक्की आम्ही कारवाई करू.’ असा इशारा जानकर यांनी दिला. त्यांनी रासपचे आमदार रत्नागर गुट्टे यांना हा इशारा दिला आहे.
पुणेः राज्यात महायुतीला अभूतपूर्व बहुमत मिळाले असले, तरी ‘ईव्हीएम’विरोधात मोठे आंदोलन उभे राहत आहे. अनेक ठिकाणी पराभूत उमेदवारांनी फेर मतमोजणीसाठी पैसे जमा केले आहेत. अनेक गावात मतदार आणि मतदानाची संख्या जुळत नसल्याचा त्यांचा आरोप आहे. राज्यात ‘ईव्हीएम’विरोधात रान पेटत असतानाच दुसरीकडे पुण्यात ९५ वर्षींय समाजसेवक बाबा आढाव यांनी या सर्व प्रकाराविरोधात आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे.
‘ईव्हीएम’च्या घोटाळ्यावर आढाव यांनी घाणाघात केला. ‘ईव्हीएम’चे निराकरण झाले पाहिजे. आम्हाला दाबायचा प्रयत्न करू नका. आम्हाला दाबायचा प्रयत्न केला तर असे होणार नाही. माझ्यासारखी माणसे मरण पत्करतील; पण दाबले जाणार नाही. आम्हाला हे स्वातंत्र्य असे नाही मिळाले. आम्हाला संघर्ष करावा लागला आहे. दोन तीन प्रश्न आहेत. त्याचे निराकरण करा. लोकसभा आणि विधानसभेतील मतदान आणि निकालात फरक कसा. याचा छडा लागला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
आम्ही शत्रू नाही. आपण मित्रच आहोत; पण प्रश्नाचे निराकरण झाले पाहिजे. मी नमस्कार म्हणत नाही. जिंदाबाद म्हणतो. दादा तुम्ही आलात, मी दोनदा जिंदाबाद म्हणतो. तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद देतो, असे आढाव दादांना म्हणाले. मला वाटते काही प्रयत्न निघाला नाही, तर आम्ही हे आंदोलन शांततामय मार्गाने पुढे नेईल. ते वाया जाऊ देणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. ‘ईव्हीएम’मधील गैरप्रकार सिद्ध करण्याचे काम आपले आहे. घटनेला ७५ वर्षे होत आहेत. मी आत्मक्लेश सुरू केला आहे. हे सरकार कुणालाच जुमानत नाही. मतपेटीत जे झाले, त्याचा छडा लागलाच पाहिजे, याचे निराकरण झाले पाहिजे, अशी मागणी आढाव यांनी केली.
न्यायालयातून मार्ग निघत नाही, म्हणून जनआंदोलन केले जाते. त्याने केले म्हणजे आम्ही केले असे होत नाही. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहोत. फक्त दडपू नका. तसा शब्द द्या. आतापर्यंत खूप दडपण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आढाव यांनी सरकारवर केला. न्यायालयात न्यायाधीशांपेक्षा मला जनतेची न्यायबुद्धी महत्त्वाची आहे. आमचे आंदोलन चिरडले जाऊ नये. नाही तर चिघळले जाईल, चळवळी उभ्या करणे आमचे काम आहे. हे आंदोलन सुरू झाले. त्यात विधायक बाजू आहे. चळवळीच्या हक्काच्या बाजू आहेत. ते चिरडले जाऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सरकारी यंत्रणाचा गैरवापर
१९५२ पासून निवडणूका पाहिल्या; मात्र या वेळी सरकारी यंत्रणाचा खूप वापर झाला. तुम्ही सरकार आहात. तुम्ही पवार आहात मी काय बोलणार? याचे निराकण झाले पाहिजे. दाबायचा प्रयन्त केला तर लोक बाहेर पडणार, असा इशारा देत मी कधी दगड हातात घेतला नाही, शिव्या दिल्या नाहीत, मला अटक झाली. मी नमस्कार म्हणत नाही, मी झिंदाबाद म्हणतो, असे बाबा म्हणाले.
पुणेः काही लोकांनी ‘ईव्हीएम’ कसे सेट केले जाते, याचे आम्हाला प्रेझेंटेशन दिले होते. आम्ही त्यावर विश्वास ठेवला नाही. निवडणुकीत इतके काही टोकाचे होईल असे कधी वाटले नव्हते. आम्ही यापूर्वी कधी निवडणूक आयोग या संस्थेवर संशय व्यक्त केला नाही. पण, निकालानंतर आता तथ्य दिसत आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘ईव्हीएम’ हॅक होण्याची शक्यता व्यक्त केली.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश आंदोलनाला भेट दिली. तेव्हा पवार बोलत होते. ९५ वर्षीय आढाव यांच्या या आंदोलनाची दखल राजकीय नेतेही घेत आहेत. आज सकाळी पवार यांनी महात्मा फुले वाड्यात आढाव यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच या भेटीनंतर माध्यमांशी बोलत असताना निवडणुकीतील गैरप्रकाराबाबत लोकांमधून उठाव होण्याची आता गरज असल्याचे ते म्हणाले.
पवार म्हणाले की, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्यासंबंधीची अस्वस्थता संपूर्ण राज्यात दिसत आहे. निवडणुकीत झालेली अनियमितता पाहून आढाव यांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीत झालेला सत्तेचा गैरवापर आणि पैशांचा महापूर याआधी कधीही पाहायला मिळाला नव्हता. स्थानिक निवडणुकांत अशा घटना ऐकायला मिळतात. पण, राज्याच्या निवडणुकात असे चित्र कधी पाहायला मिळाले नव्हते. त्यामुळे लोकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. ‘ईव्हीएम’मध्ये गडबड असल्याचा आरोप केला जात आहे. याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “काही लोकांनी ‘ईव्हीएम’ कसे सेट केले जाते, याचे आम्हाला प्रेझेंटेशन दिले होते. आम्ही त्यावर विश्वास ठेवला नाही. पण निवडणुकीत इतके काही टोकाचे होईल असे कधी वाटले नव्हते. आम्ही यापूर्वी कधी निवडणूक आयोग या संस्थेवर संशय व्यक्त केला नाही. पण निकालानंतर आता तथ्य दिसत आहे. राज्यातील २२ उमेदवारांनी फेरमतमोजणी करण्यासाठी अर्ज केला आहे. यातून काही साध्य होईल का? याबाबत मला शंका वाटते.’’
“निवडणुकीत झालेल्या गैरव्यवहाराच्या विरोधात आवाज उचलण्यासाठी लोकांमध्ये पुन्हा जावे लागेल. लोक जागृत आहेतच, त्यांना उठावासाठी तयार करावे लागेल. बाबा आढाव यांच्या आंदोलनाचा परिणाम आज ना उद्या झाल्याशिवाय राहणार नाही.” असे सांगून ते म्हणाले की, आढाव यांच्या उपोषणाने एकप्रकारचा दिलासा सामान्य माणसांना मिळत आहे. राष्ट्रीय कर्तव्य म्हणून त्यांनी ही भूमिका घेतली; पण त्यांनी एकट्यानेच भूमिका घेणे पुरेसे नाही. जनतेचाही यासाठी उठाव व्हायला हवा, अन्यथा संसदीय लोकशाही उध्वस्त होईल.
विरोधकांना बोलू दिले जात नाही
देशाची सूत्रे ज्यांच्या हाती आहेत, त्यांना याची काही पडलेली नाही. संसदेत आम्ही मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, तर आम्हाला बोलू देत नाहीत. रोज सकाळी ११ वाजता विरोधी पक्षनेते आपले म्हणणे मांडण्यासाठी बोलायला उभे राहतात; पण त्यांना बोलू दिले जात नाही. मागच्या सहा दिवसात संसदेत देशाच्या एकाही प्रश्नाची चर्चा होऊ शकलेली नाही,” असे पवार म्हणाले.