नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील कुत्रा चावण्याच्या घटनांच्या चिंताजनक आकडेवारीकडे लक्ष वेधले आहे. तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यात २०२६ मध्ये पहिल्या चार महिन्यात दोन लाखांहून अधिक नागरिकांना कुत्रा चावला आहे. त्यामध्ये काहीजणांचा मृत्यूही झाला आहे. कुत्र्यांनी लहान मुले, वृद्ध, महिलांवरही हल्ले केल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संदीप मेहता, न्यायमूर्ती एन.व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने निरीक्षण नोंदवले आहे. (Two Lakh Citizens Bitten by Dogs in Tamil Nadu and Karnataka)
मोकाट कुत्र्यांमुळे सार्वजनिक सुरक्षेला धोका
भटक्या कुत्र्यांसंदर्भात १९ मे रोजी निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने पिसाळलेल्या कुत्र्यांना मारा असा आदेशही दिला आहे. तसेच भटक्या कुत्र्यांसाठी निवारा केंद्रे उभारण्याचाही आदेश दिला आहे. मोकाट कुत्र्यांच्या समस्येची व्याप्ती वाढत असून सार्वजिनक सुरक्षेला धोका पोहोचला आहे असे मत व्यक्त केले आहे. अशा घटना मोठ्या प्रमाणात सातत्याने होत असून त्यामुळे गंभीर जखमी होण्याच्या घटना घडत आहेत. अनेकांना मानसिक आघात झाला आहे. काहींना जीवही गमवावे लागले आहेत. मोकाट कुत्र्यांच्या गंभीर धोक्यामुळे दाट लोकवस्तीत त्यांना स्थान नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. (Two Lakh Citizens Bitten by Dogs in Tamil Nadu and Karnataka)
तामिळनाडूत २.६३ लाख नागरिकांना कुत्री चावली.
न्यायालयाने तामिळनाडूचा संदर्भ देताना २०२६ मध्ये पहिल्या चार महिन्यात तामिळनाडूत २.६३ लाख कुत्रा चावण्याच्या घटना घडल्या असून त्यामध्ये १७ जणांचा मृत्यू झाला आहे असे सांगितले. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात ६२ हजार, मार्च महिन्यात ७१ हजार तर एप्रिलमध्ये ६८ हजार कुत्रे चावण्याच्या घटना घडल्या आहेत. गतवर्षी २०२५ मध्य तामिळनाडूत ६.२५ लाख कुत्रा चावण्याच्या घटना आहेत. कुत्र्यांच्या हल्ल्यात ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. (Two Lakh Citizens Bitten by Dogs in Tamil Nadu and Karnataka)
कर्नाटकात २०२६ च्या पहिल्या चार महिन्यात दोन लाख नागरिकांना कुत्रा चावल्याच्या घटना घडल्या आहेत. रेबीजमुळे २५ जणांना जीव गमवावा लागला आहे. न्यायालयाने सादर केलेल्या अहवालानुसार विजयपुरा जिल्ह्यात १३ हजार ९९७ प्रकरणे नोंदवली आहेत. तर राजधानी बेंगळुरूमध्ये १३, ४०० कुत्रे चावल्याच्या घटना घडल्या आहेत. बेंगळूरमध्ये सहा जणांचा रेबीजमुळे मृत्यू झाला आहे.
न्यायालयाने नमूद केलेल्या कुत्रे चावण्यांच्या घटनाची नोंद
१ . राजस्थान उदयपूरमध्ये तीन महिन्यात १८४० कुत्रा चावण्याच्या घटना.
२ . भिलवाडा येथे एकाच दिवसात ४२ जणांना मोकाट कुत्री चावली.
३ . नवी दिल्ली इंदिरा गांधी विमानतळ परिसरात ३१ कुत्रा चालण्याच्या घटना.
४ . सुरत शहरात जर्मन प्रवाशांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला.