मुंबई : विशेष प्रतिनिधी : पाच वर्षांपूर्वी झालेल्या दिशा सालियान हिच्या मृत्यूप्रकरणी तिच्या वडिलांनी फेरयाचिका दाखल केल्याने सत्ताधाऱ्यांकडून ठाकरे कुटुंबीयांवर आरोपांचा फैरी झडत आहेत. मात्र आता आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Disha Salian Case)
दिशाने वडिलांच्या अफेअरमुळे संबंधिताला द्यावी लागलेली रक्कम आणि आर्थिक तणावातून आयुष्य संपवल्याचे मालवणी पोलिसांनी ‘क्लोजर रिपोर्ट’मध्ये नमूद केले होते. कष्टाने कमावलेला पैसा नको त्या बाबींसाठी खर्च होत असल्याने ती मानसिक तणावात होती, असे निष्कर्ष काढून पोलिसांनी तपास बंद करण्याबाबत कळविले होते. मात्र आता पुन्हा तिच्या वडिलांनी याचिका दाखल केल्याने हा ‘क्लोजर रिपोर्ट’ मागे घेण्यात आला असल्याचे मुंबई पोलिसातील सूत्रांकडून सांगण्यात आले. (Disha Salian Case)
दिशा सालियानचा मृत्यू ८ जून २०२० रोजी झाला होता. त्यानंतर तीन दिवसांनी तिचे पोस्टमॉर्टम झाल्याची नोंद आहे. त्यामध्ये दिशाच्या शरीरावर हाताला, पायाला, छातीवरही जखमा झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दिशाच्या डोक्यावर गंभीर जखम झाल्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचे या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच दिशाच्या नाकातून आणि तोंडातूनही रक्त येत होते, असेही रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. मात्र तिच्यावर कुठलाही लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार झालेला नाही असे रिपोर्टमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
वडिलांच्या एका अफेअरमुळे दिशा त्यांना पैसे देऊन देऊन थकली होती. दिशाने वडिलांच्या या विवाहबाह्य सबंधांबद्दल तिचा होणारा पती आणि अन्य मित्रांनाही सांगितले होते. या गोष्टींमुळेच तणावातून दिशाने आत्महत्या केल्याचा मालवणी पोलिसांचा निष्कर्ष आहे. (Disha Salian Case)
याच आर्थिक तणावातून तिने आत्महत्या केल्याचे मालवणी पोलिसांच्या तपासानंतर अहवालात नमूद केले होते. यापूर्वी झालेल्या शवविच्छेदन अहवालामध्येही दिशावर कोणत्याही प्रकारचा अत्याचार झाला नसल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. या अहवालात डोक्याला गंभीर इजा होऊन दिशाचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे जवळपास पाच वर्षानंतर पुन्हा याप्रकरणी सतीश सालियन यांनी फेरतपास करण्याची मागणी केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण निर्माण झाले आहे. उच्च न्यायालय याबाबत कोणता निर्णय देते, यावर पुढील दिशा स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा :
कोरटकरवर कोर्टात हल्ला
विरोध निष्फळ, न्या. वर्मा यांची बदली