पुणे : येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे गर्भवतीचा मृत्यू झाला होता. या घटनेवरून दीनानाथ रुग्णालय प्रशासनावर टीकेची झोड उठली होती. घटनेत तनिषा भिसे या गर्भवतीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या घटनेच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले.(Suley criticized Report)
या प्रकरणाची चौकशी चार वेगवेगळ्या समित्यांकडून सुरू आहे. त्यांपैकी ससून रुग्णालयाचा अहवाल पुणे पोलिसांना मिळाला आहे. त्यात या रुग्णालयाची काहीही चूक नसल्याचे म्हटल्याचे समजते. एकूणच या प्रकरणात रुग्णालयाला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यावरून पुन्हा एकदा राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या अहवालातील क्लीन चीटसंदर्भात विचारले असता, हा अहवाल अमान्य आहे, तो जाळून टाका, अशी संतप्त प्रतिक्रीया दिली. (Suley criticized Report)
पुण्यात माध्यमांशी बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, महिलांविषयी सरकार किती असंवेदनशील आहे, हे या अहवालातून दिसते. अहवालाचा आम्ही निषेध करतो. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झालेला असतानाही सरकार काहीच कारवाई करत नाही. त्या माऊलीला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. ससून रुग्णालयाच्या समितीने दिलेला हा अहवाल स्वीकारत नाही. तो कचऱ्याचा डब्यात टाका; नव्हे तर जाळून टाका.
प्रशांत जगतापना पाठिंबा
तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते प्रशांत जगताप यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे कौतुक करत खासदार सुळे यांनी प्रशांत जगताप यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. पक्ष त्यांच्यासोबत असेल, अशा शब्दांत त्यांनी आश्वस्त केले. जगताप येत्या २४ तारखेला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात याचिका दाखल करणार आहेत. (Suley criticized Report)
अहवाल काय सांगतो?
‘ससून’ने दिलेल्या अहवालात मंगेशकर रुग्णालयास क्लीन चिट देण्याचा प्रयत्न आहे. इंदिरा आयव्हीएफमध्ये तब्येतीत सुधारणा होत नसतानाही भिसे यांना ४-५ दिवस दाखल ठेवणे ही चूक होती. ही जबाबदारी आयव्हीएफ सेंटरची आहे. अतिजोखमीचा रुग्ण असल्यामुळे भिसे यांना मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात नेले पाहिजे होते.
हेही वाचा :
शपथ घ्या, मग हाळी द्या
महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री आहे का?