नवी दिल्ली : डेहराडूनमधील पंचकुला परिसरातील एका कारमध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मोठ्या कर्जामुळे या कुटुंबाने टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी चर्चा आहे. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. प्राथमिक तपासात कुटुंबाने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या दुःखद घटनेमागील मोठे कर्ज हे कारण असल्याचे मानले जात आहे. (Seven dead in car)
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डेहराडून येथील रहिवासी प्रवीण मित्तल सोमवारी बागेश्वर धाम येथे आयोजित हनुमान कथा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्या कुटुंबासह पंचकुला येथे आले होते.कार्यक्रम संपल्यानंतर, त्यांनी देहरादूनला परतताना आत्महत्या करण्याचे कठोर पाऊल उचलले असावे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
मृतांची ओळख पटली असून प्रवीण मित्तल (वय ४२ ) जे देहरादूनचे रहिवासी आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे आईवडील, पत्नी आणि त्यांच्या दोन मुली आणि एक मुलाने आत्महत्या केली आहे. कारमध्ये सर्वजण तडफडत असल्याचे स्थानिक नागरिकांनी पाहिल्यावर त्यांनी आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली डायल ११२ ला कळवले आणि पीसीआर घटनास्थळी दाखल झाले. कारच्या काचा फोडून कारचे दरवाजे उघडण्यात आले. अत्यवस्थ अवस्थेत दोन हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. (Seven dead in car)
पंचकुला डीसीपी हिमाद्री कौशिक आणि डीसीपी कायदा आणि सुव्यवस्था अमित दहिया तपासावर देखरेख करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. डीसीपी अमित दहिया यांनी पत्रकारांशी बोलताना “कोणत्याही निष्कर्षावर पोहोचणे सध्या घाईचे होणार आहे. सध्या तपास सुरू आहे आणि चौकशी आणि इतर औपचारिकता पूर्ण करण्यासाठी आम्ही त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत,” (Seven dead in car)