महाराष्ट्र दिनमान ऑनलाइन डेस्क : बीसीसीआयने आयपीएल २०२५ साठी रिटेंशन नियमांची घोषणा केली आहे. आयपीएलमधल्या सर्व फ्रँचाईजींना ३१ ऑक्टोबरपर्यंत रिटेन खेळाडूंची यादी आयपीएल गव्हर्निंग काऊंसीलकडे सोपवायची आहे. पण बीसीसीआयचा एक नियम चेन्नई सुपर किंग्ससाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बीसीसीआयने एक जुना नियम पुन्हा लागू केला आहे. याचा फायदा चेन्नई संघाला होऊ शकतो. (MS Dhoni)
आयपीएलचा खास नियम
बीसीसीआयच्या नियमानुसार एखादा खेळाडू गेल्या पाच वर्षात भारतासाठी एकही सामना खेळला नसेल तर त्याला अनकॅप्ड खेळाडू मानलं जाईल. अशात त्या खेळाडूची किंमत कमी होईल आणि फ्रँचाईजच्या पैशात बचत होऊ शकते. हा नियम चेन्नई सुपरकिंग्सचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर लागू होऊ शकतो. एमएस धोनीने १५ ऑगस्ट २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. जुलै २०१९ मध्ये तो आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. (MS Dhoni)
धोनीला लागू होतो नियम
बीसीसीआयच्या या नियमानुसार चेन्नई सुपर किंग्स अवघ्या 4 कोटी रुपयात एमएस धोनीला आपल्या संघात घेऊ शकते. धोनी आयपीएलमध्ये फारतर पुढचा आणखी एक हंगाम खेळण्याची शक्यता आहे. अशात स्वत: धोनीला संघाने आपल्यावर जास्त पैसे खर्च असं वाटू शकतं. पण एक मात्र नक्की की हा नियम लागू झाल्याने धोनी आयपीएलचा पुढचा हंगाम खेळण्याची शक्यता वाढली आहे. पण चेन्नईचे सीईओ काशी विश्वनाथन यांच्या एका वक्तव्याने चाहत्यांना हैराण केलं आहे. टाईम ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीती चेन्नईचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी ‘ या नियमाचा वापर धोनीसाठी करण्याबाबत विचार केला नसल्याचं’ म्हटलं आहे. यावर बोलणं आता खूप घाईचं होईल, आम्ही धोनी बरोबर अद्याप चर्चा केलेली नाही. धोनी अमेरिकेत होता, येणाऱ्या काही दिवसात धोनीबरोबर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल. सध्या तरी आम्हाला इतकाच आशावाद आहे की धोनी पुढचा हंगाम खेळेल. पण सर्वस्वी त्याचा निर्णय असेल’ असंही विश्वनाथान यांनी म्हटलं आहे.
आयपीएलचा नियम काय सांगतो?
आयपीएलच्या नियमानुसार गेल्या पाच वर्षात खेळाडू एकही आंतरराष्ट्रीय म्हणजे कसोटी, एकदिवसीय किंवा टी २० सामना खेळला नसेल किंवा बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टचा भाग नसेल तर तो खेळाड अनकॅप्ड ठरतो. भारतीय खेळाडूंनाही हा नियम लागू होतो.
हेही वाचा :