कोल्हापूर : प्रतिनिधी : महात्मा गांधीजींची सत्य, अहिंसा आणि प्रेम ही तत्त्वे आयुष्याला दिशा देणारी आहेत, असे मत अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. बी. धीरज कुमार यांनी व्यक्त केले. (CSIBER speech)
गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव यांच्या सहकार्याने सायबर महाविद्यालयात महात्मा गांधी विचार संस्कार परीक्षा आयोजित केली होती. त्यामध्ये ५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण प्रसंगी ते बोलत होते.
पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी गांधी विचारांचा अभ्यास करून ही परीक्षा दिली ही प्रेरणादायी गोष्ट आहे. आजच्या काळात समाज परिवर्तनात देशाला आणि जगाला दिशा देणाऱ्या महापुरुषांबाबत विचारमंथन होत नाही. वास्तविक महात्मा गांधींचे विचार, तत्वे आणि एकंदर जीवनचरित्रातून खूप काही शिकण्यासारखे आहे. त्याचा आधार घेऊन तरुणांनी आपली ध्येय गाठण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रत्येकांच्या आयुष्यात कित्येक वेळेस निराशाजनक परिस्थिती उद्भवते. अशा परिस्थितीला समर्थपणे तोंड देण्यासाठी महापुरुषांचे विचार उपयोगात येऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले. (CSIBER speech)
डॉ धीरज कुमार हस्ते परिक्षेत प्रथम क्रमांक आलेल्या प्रवीण पुजारी या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व मेडल देऊन सत्कार करण्यात आला. स्केटिंग प्रकारात जागतिक पातळीवर यश संपादन केलेल्या आर्या पाटील, क्रीडाक्षेत्रात नावलौकीक असलेले क्रीडाप्रशिक्षक योगेश सरनाईक व रामेश्वरी गुंजेकर यांचा सत्कार करण्यात आला.
रायगड येथील स्वदेश फाउंडेशन संस्थेचे कार्यकारी संचालक तुषार इनामदार यांनी ड्रिम व्हिलेज या महत्वाकांक्षी प्रकल्पाविषयी उपस्थितांना माहिती दिली तर यशवंतराव चव्हाण समाजकार्य महाविद्यालयांचे डॉ. पंकज कुमार दास यांनी आपली ध्येये कश्या पद्धतीने साध्य करावीत या विषयी निवेदन केले. (CSIBER speech)
कार्यक्रमाचे आयोजन डॉ. दीपक भोसले यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय विनायक सुतार यांनी करून दिला कार्यक्रमाची सूत्रसंचालन कल्याणी सातपुते यांनी केले. डॉ. सुरेश आपटे यांनी आभार मानले. पाहुण्यांचा स्मृतिचिन्ह व रोप देऊन सायबरच्या संचालिका डॉ. बिंदू मेनन, डॉ टी. व्ही. जी सरमा, डॉ. सोनिया रजपूत यांच्या हस्ते करण्यात आला. ‘सायबर’चे अध्यक्ष डॉ. रणजीत शिंदे व सीए ऋषिकेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास डॉ. दुर्गेश वाळवी, डॉ. कालिंदी रानभरे, डॉ. विनायक साळोखे व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा :
बीडमध्ये आणखी एक भयंकर घटना
आणि घरात कपडे पेटवणारी भानामती पळाली !