महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारताने कानपूर कसोटीत (IND vs BAN 2nd Test) बांगलादेशचा सात गडी राखून पराभव करत दोन सामन्यांची कसोटी मालिका २-० अशी जिंकली. टीम इंडियासमोर ९५ धावांचे लक्ष्य होते, हे आव्हान रोहित सेनेने तीन गडी गमावून पूर्ण केले. बांगला देशने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना ऋषभ पंत ४ तर, विराट कोहली २९ धावांवर नाबाद राहिला. रोहित शर्मा ८, शुभमन गिल ६ आणि यशस्वी जैस्वाल ५१ धावा करून बाद झाला. विराट आणि यशस्वी यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी झाली. बांगलादेशकडून मेहदी हसन मिराजने दोन, तर तैजुल इस्लामला एक विकेट मिळाली. यशस्वीने आपल्या अर्ध शतकी खेळीत आठ चौकार आणि एक षटकार लगावला.
कानपूर कसोटीत वरूण राजाने केलेल्या दमदार फलंदाजीमुळे पहिल्या दिवशी फक्त ३५ षटकांचा खेळ झाला. यानंतर सामन्यातील दुसरा आणि तिसरा दिवस पावसामुळे वाहून गेला. यानंतर झालेल्या खेळात भारतीय गोलंदाजांनी तिखट मारा करत बांगला देशचा पहिला डाव २३३ धावांवर गुंडाळला. यानंतर भारतीय संघाने ९ फलंदाज गमावून २८५ धावा करून डाव घोषित केला. यामुळे टीम इंडियाकडे ५२ धावांची आघाडी होती. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या बांगला देशच्या दोन फलंदाजांना गोलंदाजांनी तंबूत पाठवले. यामुळे बांगला देशने आज (दि.१) २ बाद २६ धावांवर खेळण्यास सुरूवात केली. उर्वरित १२० धावा करताना बांगला देशचे आठ फलंदाज बाद झाले. या डावात बांगला देशकडून शादमान इस्लामने सर्वाधिक ५० धावांची खेळी केली. यामध्ये १० चौकार लगावले. त्याच्यासह मोमिनुल हक (२), कर्णधार नजमुल शांतो (१९), मुशफिकुर रहीम (३७), लिटन दास (१), मेहदी हसन मिराज (९) यांचा समावेश आहे. शकील अल हसन आणि तैजुल इस्लाम यांना खातेही उघडता आले नाही. याआधी सोमवारी झाकीर हसन (१०) आणि हसन महमूद (२) तंबूत परतले. भारताकडून जसप्रीत बुमराह, आर. अश्विन आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी तीन बळी घेतले. तर आकाश दीपला एक विकेट मिळाली. बांगला देशचा दुसरा डाव १४६ धावांवर आटोपल्याने भारताला विजयासाठी केवळ ९५ धावांचे लक्ष्य मिळाले. (IND vs BAN 2nd Test)
कानपूरमध्ये मालिका विजय
बांगला देशचा दुसरा डाव १४६ धावांवर आटोपल्यामुळे टीम इंडियासमोर विजयासाठी ९५ धावांचे लक्ष्य होते. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाला तिसऱ्याच षटकात पहिला झटका मिळाला. भारताचा कर्णधार रोहित शर्मा ८ धावांवर तंबूत परतला. यानंतर ३४ धावांवर शुभमन गिलच्या (६) रूपात भारताला दुसरा धक्का बसला. यानंतर यशस्वी आणि विराट यांनी डाव सावरत विजयाच्या दिशेने नेले. १६ व्या षटकात आक्रमक फटका मारण्याच्या नादात जैस्वाल बाद झाला. त्याने ४५ चेंडूत ८ चौकार आणि १ षटकार फटकावत ५१ धावांची खेळी केली. विराट आणि यशस्वीची तिसर्या विकेटसाठी निर्णायक ५८ धावांची भागीदारी झाली. १८ व्या षटकात भारताने ९५ धावांचे लक्ष्य पूर्ण केले. (IND vs BAN 2nd Test)
कानपूर कसोटीत रोहित सेनेचा विक्रम
कानपूर कसोटी टीम इंडियाने आक्रमक खेळीचे प्रदर्शन केले. वरूण राजाच्या फलंदाजीमुळे पहिल्या दिवशीचा खेळ विस्कळीत झाला. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाहून गेला. चौथ्या दिवशी खेळ सुरू झाला आणि बांगला देशला पराभूत करून भारताने शानदार फलंदाजी प्रदर्शन करत कसोटीत कोणत्याही संघाकडून सर्वात जलद ५०, १००, १५०,२०० आणि २५० धावा करण्याचा विश्व विक्रमही केला.
Captain @ImRo45 collects the @IDFCFIRSTBank Trophy from BCCI Vice President Mr. @ShuklaRajiv 👏👏#TeamIndia complete a 2⃣-0⃣ series victory in Kanpur 🙌
Scorecard – https://t.co/JBVX2gyyPf#INDvBAN pic.twitter.com/Wrv3iNfVDz
— BCCI (@BCCI) October 1, 2024
हेही वाचा :