हैदराबाद : हैदराबादमध्ये सकाळी फिरायला गेलेल्या सीपीआय नेते चंदू राठोड यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी (१५ जुलै) सकाळी घडली. (CPI leader killed)
राठोड मंगळवारी सकाळी हैदराबादमधील शालिवाहन नगर पार्क येथे मॉर्निंग वॉक घेत होते. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून त्यांची हत्या केली. राठोड यांना चंदू नायक म्हणूनही ओळखले जाते. ते सीपीआयचे हैदराबाद शहर समिती सदस्य होते.
दरम्यान, या घटनेवर प्रतिक्रिया देताना चंदू राठोड यांच्या कुटुंबाने त्यांच्यात आणि प्रतिस्पर्धी कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्यामध्ये सतत वैर होते. त्यातून ही हत्या घडली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. (CPI leader killed)
मलकपेट पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तीन ते चार हल्लेखोरांनी हा हल्ला केला. अद्याप कारण स्पष्ट झालेले नाही.
हल्लेखोर सकाळी ७.३० वाजता मारुती स्विफ्ट कारमधून आले होते. त्यांनी राठोड यांच्या चेहऱ्यावर मिरची पावडर फेकली आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यावेळी पार्कमध्ये २० ते २५ लोक उपस्थित होते. त्यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र हल्लेखोर गाडीतून पळून गेले. (CPI leader killed)
घटनास्थळी पाच राउंड गोळीबार करण्यात आल्याचे दिसत असल्याचे मलकपेट पोलिस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
राठोड यांच्या कुटुंबाने राठोड आणि प्रतिस्पर्धी कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्यामध्ये सतत शत्रुत्व होते, असे पोलिसांनी सांगितले. मात्र आम्ही या प्रकरणातील सर्व संभाव्य पैलूंचा तपास करत आहोत, असे मलकपेट पोलिस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, या घटनेमागे राजकीय शत्रुत्व होते का हे जाणून घेण्यासाठी आम्ही तपशीलांची वाट पाहत आहोत, असे सीपीआयचे राष्ट्रीय नेते के. नारायण यांनी सांगितले.