कोल्हापूर; प्रतिनिधी : कसबा बावडा येथील भगवा चौकात बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण नव्या नियोजनानुसार शनिवारी (दि. ५) लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता हा सोहळा होणार आहे.
शुक्रवारी (दि. ४) संध्याकाळी हा कार्यक्रम होणार होता. मात्र तांत्रिक कारणामुळे विमानोड्डाण रद्द झाल्याने कार्यक्रम स्थगित करण्यात आला. शनिवारी सकाळी दहा वाजता पुतळ्याचे अनावरण होईल, असे सांगून विधिमंडळातील काँग्रेसचे नेते सतेज पाटील म्हणाले, पुतळा अनावरणानंतर राहुल गांधी नर्सरी बागेतील राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते हॉटेल सयाजी येथे आयोजित संविधान सन्मान संमेलनाला उपस्थित राहतील.
दरम्यान, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी आमदार रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, माजी महसूल मंत्री, आ. बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार डॉ. विश्वजित कदम, आमदार भाई जगताप आदी नेते उपस्थित कोल्हापुरात उपस्थित झाले आहेत.
हेही वाचा :