सांगली; प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण ९ हजार ७४८ वाहनांवर कारवाई केली. त्यांना ८२ लाख २४ हजार ६०० रुपयांचा दंड केला. मॉडिफाय सायलेन्सरवर बुलडोझर फिरवला. (Sangli News)
जिल्ह्यात कार्यरत वाहतूक नियंत्रण शाखांच्या माध्यमातून नाकाबंदी, पेट्रोलिंग दरम्यान वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. आतापर्यंत ९ हजार ७४८ वाहनांवर मोटार वाहन अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली. या वाहनांच्या चालकांना ८२ लाख २४ हजार ६०० रुपयांचा दंड केला. तसेच १ हजार ४३३ वाहन चालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ९ लाख १२ हजार ९०० रुपये दंड वसूल केला. नियम मोडल्याबद्दल १३४ वाहन चालकांविरुद्ध न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत.
आचारसंहिता काळात वाहन परवाना तरतुदीचा भंग केल्याबद्दल तसेच बेकायदा प्रवासी वाहतूक केल्याबद्दल ४१ रिक्षा व जीप चालकांवर कारवाई केली. मॉडिफाय सायलेन्सर लावून गोंगाट केल्याबद्दल ५३ दुचाकीच्या सायलेन्सर बुलडोझर फिरविला.