बीजिंग : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कितीही हटवादी भूमिका घेतली असली तरी चीनने आपली ताठर भूमिका सोडलेली नाही. चिनी आयातीवर १०४% नवीन कर लागू केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, चीनने अमेरिकन वस्तूंवरील कर ३४% वरून ८४% पर्यंत वाढवण्याची घोषणा केली. चीनच्या या भूमिकेमुळे मेरिका-चीन व्यापार युद्ध वाढण्याची दाट शक्यता आहे. (US-China trade war)
अमेरिकेची करवाढीची कृती जागतिक व्यापार कराराचे उल्लंघन करणारी आहे. जागतिक स्थैर्यासाठी ते धोकादयक आहे, अशी भूमिका चीनने सुरूवातीपासूनच घेतली आहे. चीनने लागू केलेले करवाढीचा निर्णय गुरुवारी (९ एप्रिल) दुपारी १२:०१ पासून लागू होईल, असे चीनच्या अर्थमंत्रालयाने म्हटले आहे. (US-China trade war)
चीनने सहा अमेरिकन कृत्रिम बुद्धिमत्ता कंपन्यांना काळ्या यादीत टाकले आहे. शिवाय ११ इतर कंपन्यांना त्यांच्या ‘अविश्वसनीय’ यादीत टाकले आहे. त्यामुळे चिनी तंत्रज्ञान क्षेत्रांत या कंपन्यांचा प्रवेश कठीण आहे. या निर्णयानंतर लगेचच चीनने करवाढीचे पाऊल उचलले.
“अमेरिका चुकांवर चुका करीत आहे. त्यामुळे चीनच्या कायदेशीर हक्कांचे आणि हितांचे गंभीर उल्लंघन होत आहे,” अशा कडक शब्दांत अर्थ मंत्रालयाने अमेरिकेचा समाचार घेतला आहे. (US-China trade war)
शिवाय चीनने जागतिक व्यापार संघटनेत अमेरिकेविरुद्ध नवीन खटला सुरू करण्याची घोषणा केली. तसेच अमेरिकेने आणखी करवाढ केल्यास त्याविरोधात शेवटपर्यंत लढण्याचा तयारीचा पुनरूच्चारही केला.
अंमलबजावणी सुरू
भारतासह अमेरिकेचे व्यापारी भागीदार असलेल्या देशांवर अमेरिकेने करवाढ लादली. बुधवार (९एप्रिल) पासून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली. सर्वाधिक करवाढ चीनवर लादण्यात आली आहे. त्याला चीननेही लगेच उत्तर दिले. हे कर व्यापार असंतुलनाच्या जुन्या समजुतीवर आधारित आहेत. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या श्वेतपत्रिकेत असे अधोरेखित केले आहे की एकदा सेवा आणि कॉर्पोरेट ऑपरेशन्स समाविष्ट केल्या की लक्षात येईल की अमेरिका-चीन व्यापार “जवळजवळ संतुलित” आहे. चीनने म्हटले आहे की २०२३ मध्ये अमेरिकेसोबत त्यांची २६.५७ अब्ज डॉलर्सची व्यापार तूट होती. त्यामध्ये प्रामुख्याने वित्त, विमा आणि व्यावसायिक सेवा यासारख्या उद्योगांचा समावेश आहे.
हेही वाचा :
आरक्षण मर्यादा वाढवणार
२६/११ चा मास्टरमाईंड राणाला आज भारतात आणणार?