चेन्नई : चेन्नई आणि उपनगरात सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाला मंगळवारी शहरातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश जारी करावे लागले. प्रादेशिक हवामान केंद्राने दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरात हवेच्या चक्रीवादळाच्या प्रभावाखाली तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ११ नोव्हेंबरपासून एक आठवडा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. (Chennai)
संबंधित चक्रीवादळ पुढील दोन दिवसांत तामिळनाडू/श्रीलंका किनारपट्टीच्या दिशेने हळूहळू पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे. चेन्नई, तिरुवल्लूर, कांचीपुरम, चेंगलपट्टू, कुड्डालोर, मायिलादुथुराई, नागापट्टिनम, तंजावर, तिरुवरूर, पुदुक्कोट्टई, रामनाथपुरम, विल्लुपुरम जिल्हे, पुद्दुचेरी आणि कराईकल प्रदेशात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे चेन्नईच्या जिल्हा दंडाधिकारी रश्मी झगडे यांनी मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर केली.