गुवाहटी : आसाम विद्यापीठाच्या कॅम्पसमधील गर्ल्स होस्टेलजवळ १७ फूट लांब शंभर किलो वजनाच्या अजगराने डेरा टाकला होता. वन्यजीवप्रेमी संघटनेच्या दहाहून अधिक कार्यकर्त्यांनी अजगराला रेस्क्यू केले. सात जणांनी या अजगराला उचलल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (Python near Hostel)
१८ डिसेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास गर्ल्स होस्टेलच्या गेट नंबर एक जवळ एका विदयार्थीने अजगराला पाहिले. तिने वर्ल्डलाईफ आणि पर्यावरणवादी कार्यकर्त्यांना अजगराची माहिती कळवली. त्यानंतर त्याला रेस्क्यू करण्यात आले.(Python near Hostel)
ऑपरेशनमध्ये सहभागी होणाऱ्या वाईल्ड लाइन आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते किशोर सोनार यांनी रेस्क्यू ऑपरेशनची माहिती दिली. ‘बर्मीज अजगर विद्यापीठाच्या कॅम्पस् मध्ये पहायला मिळतात. बकरी आणि छोटे प्राण्याची ते शिकार करतात. होस्टेलमधील एक विद्यार्थींनीने मोठा अजगर असल्याची माहिती आम्हाला दिली. माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी पोचले. एवढा मोठा अजगराला हँडल करणे आमच्या आवाक्याबाहेर असल्याने आम्ही काही विद्यार्थी सेक्युरिटी गार्ड यांची मदत घेतली’.
बारक व्हॅलीध्ये सापडलेला हा सर्वात मोठा अजगर असल्याचा दावाही करण्यात आला. सात जणांनी हा अजगर उचलण्यासाठी हातभार लावावा लागला. त्यानंतर या अजगराला जंगलात सोडण्यात आले.
हेही वाचा :