महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बॉक्सिंग डे कसोटीचा पहिला दिवस आज चांगलाच चर्चेत आहे. आजचा दिवस गाजला तो विराट आणि ऑस्ट्रेलियाचा युवा खेळाडू सॅम कॉन्स्टस यांच्यामुळे. सॅम कॉन्स्टसने कारर्किदितील पहिल्याच सामन्यात आक्रमक खेळी करत आजचा दिवस गाजवला. दरम्यान, त्याचा विराटसोबत वाद झाल्याचे पाहायला मिळाले. त्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. सामन्यादरम्यान विराट आणि सॅम कॉन्स्टस यांच्यात झालेल्या वादामुळे आयसीसीने विराटवर कारवाई केली आहे. (Virat Kohli)
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी क्रिकेट मालिकेतील चौथा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरू आहे. सामन्याच्या १० व्या षटकात मोहम्मद सिराज आणि सॅम कॉन्स्टस यांच्यात वादावादी झाली. यानंतर विराट चालत जाताना सॅम कॉन्स्टसला त्याचा धक्का बसला. यावेळी कॉन्स्टस आणि विराट यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यावेळी विराटने त्याच्या दिशेने जात त्याला काहीतरी बोलला. यामुळे दोघांमधील वाद वाढला. यावेळी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजा आणि पंच मायकेल गॉफ यांनी मध्यस्थी करत दोघांना दूर केले.
परंतु, या वादामुळे आयसीसीचे सामनाधिकारी अँडी पायक्रॉप्ट यांनी विराटवर कारवाई केली आहे. विराटच्या सामना शुल्कात २० टक्के कपात करण्यात येणार आहे. तसेच त्याला एक डिमेरिट पाँइंटही देण्यात आला आहे. विराटने आपली चूक मान्य केल्यामुळे याप्रकरणी कोणतीही कारवाई होणार नाही. दिवसाच्या खेळानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना कॉन्स्टसने ‘आम्ही दोघेही भावनांवर ताबा ठेवू शकलो नाही,’ असे सांगितले. “मला लागलीच ते जाणवले नाही. मी स्वत:चे ग्लोव्ह्ज व्यवस्थित करत होतो आणि त्याने येऊन मला खांद्याने धक्का दिला. परंतु, क्रिकेटमध्ये अशा गोष्टी होत असतात,” असे कॉन्स्टस म्हणाला. (Virat Kohli)
दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि समालोचक रवी शास्त्री यांनीही विराटच्या वर्तनावर नापसंती दर्शवली. विराटचे वर्तन अनावश्यक होते, असे शास्त्री म्हणाले.
The ICC has confirmed the sanction for Virat Kohli.#AUSvIND | #WTC25https://t.co/tfbmHJRzTi
— ICC (@ICC) December 26, 2024
हेही वाचा :