सिडनी : बॉर्डर-गावसकर मालिकेत सातत्याने फलंदाजीत अपयशी ठरत असलेल्या भारताचा डाव सिडनी कसोटीमध्ये १८५ धावांत कोसळला. या अपयशामुळे भारताच्या वाट्याला काही नकोसे विक्रम आले आहेत. अशाच काही आकडेवारीवर टाकलेला हा दृष्टिक्षेप.
- १८५ – सिडनी मैदानावर खेळलेल्या कसोटींपैकी मागील चौदा वर्षांमधील ही पहिल्या डावातील नीचांकी धावसंख्या आहे. यापूर्वी, २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाने या मैदानावर पाकिस्तानचा पहिला डाव १२७ धावांत संपवला होता.
- २ – भारताला या मोसमात एकदाही पहिल्या डावात ४०० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. संपूर्ण कसोटी मोसमामध्ये पहिल्या डावात एकदाही ४०० धावांचा टप्पा ओलांडता न आलेला भारत हा केवळ दुसराच संघ आहे. यापूर्वी, २०००-०१ च्या मोसमात वेस्ट इंडिज संघालाही पहिल्या डावात ४०० हून अधिक धावसंख्या उभारता आली नव्हती. भारताने बांगलादेशविरुद्ध चेन्नई कसोटीत केलेल्या ३७६ धावा ही या मोसमातील भारताची पहिल्या डावामधील सर्वोच्च धावसंख्या आहे. (India’s unwanted Records)
- १८.७४ – या मोसमातील भारताची पहिल्या डावातील प्रतिविकेट सरासरी. एका मोसमात किमान पाच कसोटी खेळलेल्या संघामध्ये ही सर्वांत नीचांकी प्रतिविकेट सरासरी आहे.
- ० – यंदाच्या मोसमात भारताच्या आघाडीच्या सात फलंदाजांना पहिल्या डावात एकही शतक झळकावता आलेले नाही. भारताकडून या मोसमात केवळ रविचंद्रन अश्विन आणि नितीश कुमार रेड्डी या दोघांनी पहिल्या डावात शतके झळकावली असून हे दोघेही आठव्या स्थानी फलंदाजीस आले होते. India’s unwanted Records)
- १२.६ – विराट कोहलीची २०२४-२५ च्या मोसमातील पहिल्या डावामधील सरासरी. एका मोसमात किमान दहा डाव खेळलेल्या फलंदाजांमध्ये ही पहिल्या डावातील नीचांकी सरासरी आहे. यापूर्वी, हा नकोसा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड बून यांच्या नावावर होता. त्यांनी १९९४-९५ च्या मोसमात १२.६६ च्या सरासरीने १२ डावांत १५२ धावा केल्या होत्या. (India’s unwanted Records)
- ११ – बुमराहने या मालिकेत ११ वेळा सलामीवीरांच्या विकेट काढल्या आहेत. याबरोबरच त्याने एका मालिकेमध्ये सर्वाधिकवेळा सलामीवीरांच्या विकेट घेण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न आणि इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड यांनीसुद्धा एका मालिकेत ११ वेळा सलामीवीरांना बाद केले होते. वॉर्नने २००५ च्या ॲशेसमध्ये, तर ब्रॉडने २०१३ च्या ॲशेस मालिकेत ही कामगिरी केली होती. सिडनी कसोटीचा आणखी एक डाव शिल्लक असल्याने बुमराहला हा विक्रम मोडण्याची संधी आहे.
- हेही वाचा :