कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी एक मताने देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल आज (दि.४) भाजपा जिल्हा कार्यालय येथे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात आनंदोत्सव साजरा केला. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी देवेंद्रजी आप आगे बढो हम तुम्हारे साथ है, भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा देत एकमेकांना लाडू भरून हा आनंदोत्सव साजरा केला.
याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आहे. सर्वसामान्य जनता आणि आम्हा सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा देवेंद्रजी फडणवीस व्हावेत आज ही इच्छा पूर्ण होत आहे. आम्हाला अपेक्षा आहे की, ज्या पद्धतीने २०१४ ते १९ च्या काळात महाराष्ट्र सगळ्या बाबतीत एक नंबर होता तसाच पुन्हा एकदा उद्योग, व्यापार, क्रीडा, पर्यटन, आरोग्य असेल अशा सर्व क्षेत्रांमध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुन्हा एकदा भरारी घेईल.
यावेळी विजय जाधव, महेश जाधव, राहुल चिकोडे, नाथाजी पाटील, हंबीरराव पाटील, गायत्री राऊत, डॉ. सदानंद राजवर्धन, विठ्ठल पाटील, संगीता खाडे, राजू मोरे, शैलेश पाटील, राजसिंह शेळके, भरत काळे, विशाल शिराळकर, गिरीष साळोखे, महेश यादव, अशोक लोहार, सयाजी आळवेकर, दिलीप बोंद्रे, विजय गायकवाड, भिकाजी जाधव, दत्तात्रय मिडशिंगे, शिवाजी बुवा, विजय आगरवाल, अरविंद वडगावकर, अॅड. संपतराव पवार, दिलीप मैत्राणी, रीमा पालनकर, मनोज इंगळे, रविकिरण गवळी, निरंजन घाटगे, सुमित पारखे, रोहित करंडे, विवेक कुलकर्णी यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.