श्रीनगर : काश्मिरमध्ये या हंगामातील तुफान बर्फवृष्टी सुरू झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे. रेल्वेसेवा बंद आहे. शिवाय जम्मू-श्रीनगर महामार्गही बंद ठेवावा लागला आहे. या बर्फवृष्टीचे स्थानिक नागिरक आणि पर्यटकांनी स्वागत केले असले तरी त्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले. (heavy snowfall)
श्रीनगरमध्ये सुमारे आठ इंच बर्फाची नोंद झाली. शेजारील गांदरबलमध्ये सुमारे सात इंच बर्फाची नोंद झाली. सोनमर्ग या प्रसिद्ध पर्यटनस्थळावर सुमारे आठ इंच बर्फ पडल्याची नोंद करण्यात आली आहे. नवयुग बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्यामुळे वाहने अडकून पडली आहेत. त्यामुळे वाहतूक सुरळीत करण्याच्या कामात अडथळे येत आहेत.(heavy snowfall)
या बर्फवृष्टीमुळे संपूर्ण खोऱ्याचे दळणवळण ठप्प झाले आहे. त्यामुळे पर्यटकांनी हवामान सुधारेपर्यंत आणि रस्ता मोकळा होईपर्यंत प्रवास टाळावा, असा सल्ला देण्यात आला आहे.(heavy snowfall)
श्रीनगर शहर आणि खोऱ्यातील इतर मैदानी भागात हंगामातील पहिल्या हिमवृष्टीसह शुक्रवारपासून संपूर्ण काश्मीरमध्ये मध्यम ते जोरदार बर्फवृष्टी नोंदवण्यात आली. दक्षिण काश्मीरमध्ये, मैदानी भागात जोरदार ते तुफान बर्फवृष्टी झाली, तर मध्य काश्मीरच्या मैदानी भागात मध्यम हिमवृष्टी झाली. उत्तर काश्मीरच्या मैदानी भागात हलकी ते मध्यम बर्फवृष्टी झाल्याचे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
श्रीनगर-लेह महामार्गावरील झोजिला पासवर सुमारे १५ इंच, बडगाम जिल्ह्यातील भागात ७ ते १० इंच बर्फ पडला, तर अनंतनाग जिल्ह्यातील मैदानी भागात सुमारे १७ इंच बर्फवृष्टी झाली आहे.
दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील वरच्या भागात दोन फुटांपेक्षा जास्त बर्फवृष्टी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पहलगाम या पर्यटन शहरामध्ये १८ इंच हिमवृष्टीची नोंद झाली आहे. उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा, गुरेझ, बारामुल्ला, गुलमर्ग, कुपवाडा परिसरातही जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे.
हेही वाचा :
‘सौर कृषी पंप योजने’त महाराष्ट्र अव्वल