महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : एका कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले. मुंबईत राज ठाकरेंच्या भाच्याचा लग्नाला उद्धव ठाकरे आणि परिवाराने उपस्थिती लावली.
दादरच्या राजे शिवाजी विद्यालयात आज राज ठाकरेंच्या बहिणीच्या मुलाचा लग्नसोहळा होता. भाच्याच्या या लग्नाला शुभेच्छा देण्यासाठी राज आणि उद्धवएकत्र आले. उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब या सोहळ्याला हजेरी लावत वधू वरांना आशीर्वाद दिले. या लग्न सोहळ्याचे काही व्हिडिओ, फोटो आता समोर आले आहेत. त्यात उद्धव आणि राज दोन्ही नेते बाजूला उभे राहून जोडप्यांवर अक्षता टाकत आहेत असं दिसून येते. विशेष म्हणजे नुकतेच राज ठाकरे यांनी रश्मी ठाकरेंचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या मुलाच्या लग्नाला उपस्थिती लावली होती.
ठाकरे बंधूचे एकत्र येणार?
महाराष्ट्र विधानसभा निवडणूत ठाकरे बंधूंना मोठा फटका बसला. राज ठाकरे यांच्या मनसेला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. तर उद्धव ठाकरेंच्या पक्षाला राज्यात केवळ २० जागांवर समाधान मानावे लागले. ठाकरे बंधू यांचा निवडणुकीतील पराभव पाहता अनेक मराठी माणसांकडून दोन्ही बंधूंनी एकत्र यावे अशी विनंती करण्यात येत आहे. त्याशिवाय दोन्ही पक्षातील काही कार्यकर्तेही हीच मागणी करत आहेत. त्यात आता कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र आलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे राजकीय पटलावर कधी एकत्र येणार हा खरा प्रश्न आहे.
हेही वाचा :