नवी दिल्ली :आग्र्याचा जगप्रसिद्ध ताजमहाल उडवून देण्याच्या धमकीच्या ई मेलमुळे सुरक्षा यंत्रणांची झोप उडवून दिली. मंगळवारी पर्यटन विभागाला हा मेल आला. त्यानंतर ताजमहालची सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली. परंतु, कुणीतरी हा खोडसाळपणा केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर यंत्रणांनी सुटकेचा निश्वास सोडला.
ताजमहालच्या सुरक्षा व्यवस्थेचे सहायक पोलिस आयुक्त सईद अरीब अहमद यांनी ‘एएनआय’ दिलेल्या माहितीनुसार, ताजमहाल उडवून देण्याच्या धमकीचा मेल पर्यटन विभागाला आला. त्यानंतसार पोलिसांनी ताजगणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीअंती उत्तर प्रदेश पर्यटन विभागाला पाठवलेला हा मेल कुणीतरी खोडसाळपणे पाठवल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यानच्या काळात ताजमहाल परिसर आणि भोवतालची सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली. बॉम्बशोधक आणि निकामी पथक, श्वानपथक आणि अन्य यंत्रणांनी सर्व परिसराची तपासणी केली.