महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : तोफेतून गोळा सोडत असताना तो निश्चितस्थळी न जाता जागेवरच फुटल्याने मोठा स्फोट झाला. यात आर्टिलरी सेंटरमध्ये मधील सराव करणाऱ्या दोन अग्निवीरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गोहिल विश्वराज सिंग (वय २०, मूळ रा. गुजरात, ह. मु. आर्टिलरी सेंटर, नाशिकरोड) व सैफत शीत (वय २१, मूळ रा. पश्चिम बंगाल, ह. मु. आर्टिलरी सेंटर, नाशिकरोड) अशी मृत्यू झालेल्यांची नावे असून अप्पा स्वामी (वय २०) हा आणखी एक अग्निवीर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सैन्यदलाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची नावे असून नाशिकच्या देवळाली कॅम्पमध्ये अग्नीवीरांची टीम फायर करत असताना ही दुर्देवी घटना घडली आहे. (Artillery)
याबाबत देवळाली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास इंडियन फील्ड गनद्वारे फायर रेंज आर्टिलरी इथं अग्निवीरांचा सराव सुरू होता.
या सरावादरम्यान तोफा लावून त्यावर प्रत्येकी सात अग्निवीर गोळा फेकून आपले लक्ष्य भेदत होते. त्याच सुमारास तोफ नंबर ४ च्या तोंडी गोळा टाकला आणि तो गोळा फायर केल्यानंतर लक्ष्य केलेल्या ठिकाणी न जाता तोफेपासून काही अंतरावर तो गोळा खाली पडला आणि त्याचा जागीच स्फोट झाला. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस करीत आहेत.
हेही वाचा :