मुंबई : प्रतिनिधी : विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिरावरील पाडकाम कारवाईत मुंबईचे सह पालकमंत्री मंगलप्रसाद लोढा हे निव्वळ नाटक करत आहेत, असा आरोप शिवसेनेचे आमदार अदित्य ठाकरे यांनी केली आहे. (Lodha)
मुंबई उपनगरातील विलेपार्ले भागातील एका पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरावर दोन दिवसापूर्वी मुंबई महापालिकेकडून पाडकाम कारवाई करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या या कारवाईनंतर देशभरातील जैन समुदायाकडून याचा तीव्र निषेध करण्यात आला. मुंबई महापालिकेच्या या कारवाई विरोधात शनिवारी जैन समाजाकडून निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात भाजपचे मुंबईचे सह पालकमंत्री मंगलप्रसाद लोढा आणि भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. भाजपच्या या दुटप्पी भूमिकेवर अदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. (Lodha)
अदित्य ठाकरे यांनी एक्स पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मंगलप्रभात लोढा हे मुंबईचे सहपालकमंत्री आहेत. ते नेमक्या कोणत्या गोष्टीचा निषेध करत आहेत, अशी विचारणा आदित्य ठाकरे यांनी केली आहे. आदित्य ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, सह-पालकमंत्री निव्वळ नाटक करत आहेत. खरं तर मुख्यमंत्री त्यांच्याच पक्षाचे. ज्या यंत्रणेने या मंदिराला धक्का लावला ती यंत्रणा अर्थात मुंबई महानगरपालिका देखील मुख्यमंत्री कार्यालयातून चालवली जाते. या मंदिरावर कारवाई करणारी यंत्रणा मुख्यमंत्री कार्यालयातून चालते. आणि ते ज्या जिल्ह्याचे सहपालकमंत्री आहेत, तिथल्याच परिसरात ही कारवाई झाली आहे, हे सांगताना ते नेमका कोणत्या गोष्टीचा निषेध करत आहेत, अशी विचारणा आदित्य ठाकरे यांनी केली आहे. पालिकेला सांगायचा त्यांना पूर्ण हक्क होता, की केस ऐकली जाईपर्यंत कारवाई करू नये. तसं त्यांनी का केलं नाही, असा सवालही त्यांनी केला. (Lodha)
दरम्यान जैन मंदिरावर कारवाई करणारे महापालिकेचे अधिकारी नवनाथ घाडगे यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी नवनाथ घाडगे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. यावरूनच अधिकाऱ्याची बदली झाली, पण मंत्र्यावर कारवाई कधी होणार असा सवाल ठाकरे गटाचे युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे. (Lodha)
विलेपार्ले येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरावर दोन दिवसांपूर्वी महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. नेमिनाथ कोऑपरेटीव्ह हाउसिंग सोसायटी परिसरात हे मंदिर होते. हे मंदिर ९० वर्ष पुरातन असल्याची माहिती समोर येते आहे. या जैन मंदिरावर महापालिकेकडून हातोडा चालवण्यात आला. या घटनेनंतर देशभरातली जैन समुदायाने तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच मुंबईत शांती मार्च काढण्यात आला. (Lodha)
हेही वाचा :