कोल्हापूर : प्रतिनिधी : राजस्थान येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये आज शिवाजी विदयापीठ संघाने तीन पदक पटकावली. आदिती स्वामी महिला कंपाउंड वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक पटकावले. ज्युदो महिलांच्या ७८ प्लस वजनी गटात कुमारी संस्कृती पाटील हिने ब्राँझ पदक मिळवले. सायकलिंग मध्ये ट्रॅक टाइम ट्राइल प्रकारात सायली आरंडे हिला ब्राँझ पदक मिळाले. आज अखेर शिवाजी विद्यापीठाने पदक तालिकेमध्ये दोन गोल्ड दोन सुवर्ण पदकासह व पाच ब्राँझ पदकासह नऊ पदके मिळावली आहे. उद्या शनिवारी शूटिंग व साइक्लिंगच्या स्पर्धांमध्ये विद्यापीठाचे खेळाडू सहभागी होणार आहेत .कनोइंग कायकिंग आणि मैदानी स्पर्धा एक डिसेंबर तारखेपासून सुरु होणार आहेत. (Aditi Swamy wins gold medal)
राजस्थान मधील सात शहरांमध्ये पाचव्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स २०२५ सुरू असून भारतातील २०० विद्यापीठामधून पाच हजारहून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. यामध्ये एकूण २३ क्रीडाप्रकार व एक प्रायोगिक तत्त्वावर खो-खो हा खेळ असे एकूण २४ खेळांची स्पर्धा आयोजित केली आहे. यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या एकूण १० खेळ प्रकारात सहभाग असून यामध्ये ८७ खेळाडू १७ संघ व्यवस्थापक व प्रशिक्षक आणि प्रा. डॉ. एन डी पाटील हे विद्यापीठाचे पथक प्रमुख म्हणून सहभागी झाले आहेत. (Aditi Swamy wins gold medal)
दिनांक २४ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर अखेर ही स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात कुमारी काजोल सरगर हिने सुवर्णपदकासह विद्यापीठाचे खाते उघडले. मुलांच्या १० मी एअर रायफल शूटिंग सांघिक ब्राँझ पदक पटकावले. संघामध्ये प्रतीक जोंग, अथर्व पाटील व रणवीर काटकर या खेळाडूंचा समावेश होता. त्याचबरोबर आर्चरी पुरुष वैयक्तिक रिकव्हर (५० मीटर) प्रकारात साहिल शेलार याने रौप्य पदक पटकावले. तर अत्यंत चुरशीने झालेल्या पुरुष रिकव्हर टी-इव्हेंटमध्ये शिवाजी विद्यापीठ विरुद्ध लवली प्रोफेशनल विद्यापीठ अत्यंत चुरशीच्या सामन्यात अंतिम सामन्यात अवघ्या एक गुणाने पराभव झाल्याने शिवाजी विद्यापीठास रौप्य पदक प्राप्त झाले. या संघामध्ये मयूर रोकडे, साहिल शेलार, आदित्य जाधव व प्रणव मालवेकर या खेळाडूंचा समावेश होता. कुस्ती प्रकारात आपल्या विद्यापीठाची खेळाडू सृष्टी भोसले व समृद्धी घोरपडे यांनी आपापल्या वजनी गटामध्ये ब्राँझ पदक पटकावले. (Aditi Swamy wins gold medal)