मुंबई : प्रतिनिधी : मराठी आणि हिंदी चित्रपटात अभिनय आणि आपल्या नृत्य अविष्काराने प्रेक्षकांच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सध्या यांचे वयाच्या ९४ वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक व्ही.शांताराम यांच्या त्या तिसऱ्या पत्नी होत. (Actress Sandhya)
अशिष शेलारांची श्रद्धाजंली
राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी समाजमाध्यमावरुन त्यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांच्या ट्विट मध्ये त्यांनी श्रद्धाजंली वाहिली आहे. त्यांनी ट्विट मध्ये असे म्हटले आहे की, ‘पिंजरा चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री संध्या शांताराम जी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आहे. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या अप्रतिम अभिनय आणि नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप पाडली. झनक झनक पायल बाजे, दो ऑखे बारह हाथ आणि विशेषत: पिंजरा चित्रपटामधील त्यांची अजरामर भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायम स्मरणात राहील. ईश्वर त्यांच्या आत्मास चिरशांती देवो!
पिंजरा चित्रपटाने रसिकांवर मोहिनी
संध्या यांचे मूण् नाव विजया देशमुख हाते. त्यांचा जन्म १३ सप्टेंबर १९३८ मध्ये कोची येथे झाला होता. त्या प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक, अभिनेते व्ही. शांताराम तिसऱ्या पत्नी होत्या. दिवगंत अभिनेत्री रंजना देशमुख यांच्या त्या मावशी होत्या. संध्या या अभिनयाबरोबर नृत्यांगणा म्हणून त्यांची ओळख होती. दक्षिणेतील अभिनेत्रींच्या तोडीस तोड त्यांचा नृत्याविष्कार होता. संगीतावर आधारित नवरंग, जल बिन मछली, नृत्य बिन बिजली, झनक झनक पायल बाजे या चित्रपटातील त्यांच्या भारतीय शास्त्रीय नृत्याने सर्वांना थक्क केले होते. पिंजरा आणि चंदनाची चोळी अंग अंग जाळी या मराठी चित्रपटातील त्यांची नृत्ये आणि अभिनयाने रसिकांना मोहिनी घातली होती. (Actress Sandhya)
संध्या यांचे चित्रपट
अमर भूपाळी, परछाई, तीन बत्ती चार रास्ता, स्त्री, सेहरा, लडकी सह्याद्री की या चित्रपटात त्यांनी भूमिका केली होती. पिंजरा आणि चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटातील भूमिकेबद्दल त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. (Actress Sandhya)