पुणे : शिरूर शहरातील सतरा कमानी पुलाजवळ पुणे-नगर महामार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीस भरधाव वेगात आलेल्या बसची जोरदार धडक बसली. या अपघातात मोटरसायकलवरील तरुण जागीच ठार झाला. दत्तात्रय शिवराम शिंदे (वय ३६ वर्षे, रा शिंदेवाडी मलठण ता शिरूर जि. पुणे) असे मृत तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी विकास शिवराम शिंदे यांनी शिरूर पोलिसांत फिर्याद दिली आहे. याबाबत लक्झरी बस क्रमांक एम. पी. १३. झेड. इ.९७४८ वरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Accident)
Accident
सांगली : अंकली येथील कृष्णा नदीवरील जुन्या पुलावरून कार कोसळून पती-पत्नी सह तिघांचा मृत्यू झाला. तर तीन प्रवाली जखमी झाले. मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. अपघातातील मृत आणि जखमी सांगलीचे आहेत. याबाबत जयसिंगपूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. (Sangli)
प्रसाद भालचंद्र खेडेकर (वय ३५), प्रेरणा प्रसाद खेडेकर (वय ३६ दोघे रा. गावभाग, सांगली), वैष्णवी संतोष नार्वेकर (वय २१ रा. आकाशवाणी केंद्रजवळ, सांगली) अशी मृत्यू व्यक्तींची नावे आहेत. कोल्हापूरातून लग्न सोहळा आटपून हे कुटुंबीय सांगलीकडे येत होते. अंकली पुलावर आल्यावर गाडीवरील ताबा सुटल्याने ही गाडी पुलावरून सुमारे ३५ फूट खाली कोसळली. यात तिघांचा मृत्यू झाला. तर तिघे गंभीर जखमी झाले.
समरजीत प्रसाद खेडेकर (वय ७), वरद संतोष नार्वेकर (वय १९), साक्षी संतोष नार्वेकर वय (४२, सर्व रा. सांगली) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी स्थानिक नागरिक व जयसिंगपूर पोलीसांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना सांगलीच्या सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल केले.
भरूच : वृत्तसंस्था : गुजरातमधील भरूच जिल्ह्यात सोमवारी रात्री एक भीषण अपघात झाला. त्यात सहा जणांना आपला जीव गमवावा लागला. शुक्लतीर्थ जत्रेवरून परतणाऱ्या यात्रेकरूंच्या इको कारची जंबुसर-आमोद रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडक बसल्याने हा अपघात झाला. कारमध्ये दोन महिला आणि दोन लहान मुलांसह एकूण सहा जण होते. कारची धडक एवढी भीषण होती, की कारचे छत उडून गेले. बचाव पथकाने अपघातस्थळी पोहोचून मोठ्या प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढले.
भरूचमधील जंबुसर-आमोद रोडवर झालेल्या अपघातात सपनाबेन जयदेव गोहिल, जयदेव गोविंदभाई गोहिल, कीर्तिकाबेन अर्जुनसिंग गोहिल, हंसाबेन अरविंद जाधव, संध्याबेन अरविंद जाधव आणि विवेक गणपत परमार यांचा समावेश आहे. हे सर्व लोक जंबुसरमधील वेडच आणि पंचकडा गावातील रहिवासी होते. अपघात झाला त्या वेळी हे सर्व जण शुक्लतीर्थ येथे सुरू असलेल्या जत्रेला भेट देण्यासाठी गेले होते आणि तेथून परतत असताना हा अपघात झाला. ईको कार उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ही धडक एवढी जोरदार होती की कारचे पूर्ण नुकसान झाले आहे.
ट्रक इंडिकेटर न देता उभा करण्यात आला होता. समोरून येणाऱ्या प्रखर दिव्यामुळे चालकाला काही दिसले नाही. त्यामुळे अपघात झाला. अपघातात भरधाव वेग आणि रस्त्यावरील गर्दीमुळे हा अपघात झाला. या रस्ता अपघाताच्या काही तासांपूर्वी सोमवारी सकाळी गुजरातच्या आणंद जिल्ह्यात आणखी एक भीषण रस्ता अपघात झाला. अहमदाबाद-वडोदरा द्रुतगती मार्गावर पहाटे साडेचारच्या सुमारास खासगी लक्झरी बस आणि ट्रकमध्ये धडक झाली. ही बस महाराष्ट्रातून राजस्थानला जात होती. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला, त्यापैकी तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याशिवाय या अपघातात आठ जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना रस्त्यावरून जाणाऱ्यांनी आणि पोलिसांनी रुग्णालयात नेले.
डेहराडून; वृत्तसंस्था : डेहराडूनमध्ये काल (दि.११) रात्री उशिरा मोठा अपघात झाला. या भीषण अपघातात कार अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. तर, एक जण गंभीर जखमी आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. डेहराडूनचे शहर पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार यांनी एएनआयल्या दिलेल्या माहितीनुसार काल रात्री उशिरा २ वाजता ओएनजीसी चौकाजवळ हा अपघात झाला. अपघातात चारचाकी वाहनाला धडक देणाऱ्या कंटेनरच्या चालकाला अटक करण्यात आली आहे.
या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये तीन युवक आणि तीन युवतींचा समावेश आहे. ही धडक एतकी भीषण होती की, कंटेनरने धडक दिलेल्या कारचा चक्काचूर झाला आहे. चारचाकी वाहनातून सात मुले आणि मुली फिरण्यासाठी निघाले होते.
सर्व मृत २५ वर्षाखालील
चारचाकी वाहनातून प्रवास करणारे सर्व युवक आणि युवती २५ वर्षाखालील होते. गुनीत सिंह (वय १९), कामाक्षी सिंघल (२०) आणि नव्या गोयल (२३) अशी मृत ३ मुलींची नावे आहेत. तिन्ही मुली डेहराडून येथील राहणाऱ्या आहेत. तर कुणाल कुरेजा (२३), ऋषभ जैन (२४), अतुल अग्रवाल (२४) अशी मृत मुलांची नावे आहेत. यातील कुणाल कुकरेजा हा हिमाचल प्रदेशातील चंबा येथील रहिवासी आहे. कंटेनरच्या धडकेनंतर कार झाडाला जाऊन आदळल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले.