लॉस एंजिल्स : जंगलाला लागलेल्या आगीने शेजारी नागरी वस्तीही लपेटली. एक हजारावर इमारती जळून खाक झाल्या. सुमारे १० हजारांवर लोक अक्षरश: बेघर झाले आहेत. हॉलिवूड कलाकारांची घरे भस्मसात झाली आहेत. गेले तीन दिवस आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप ती काबूत आलेली नाही. त्याची ही विदारक छायाचित्रे : (सौजन्य : सीएनएन) Los Angeles Fire)
गेले तीन दिवस लागलेली आग विझवण्यासासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करीत आहेत.
विस्तीर्ण जंगलात पसरलेली आग विझवण्यासाठी अग्निशामक विमानांची मदत घेतली जात आहे.
आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले ज्यू प्रार्थनास्थळ.
अभिनेता विल राॅजर्स यांच्या नावाने उभारलेले स्मारक आणि उद्यान आगीत नष्ट झाले. येथील इमारतीचे केवळ अवशेष उरले आहेत.
आगीत भस्मसात झालेल्या अल्ताडेना कम्युनिटी चर्चच्या इमारतीचे भग्नावशेष. (Los Angeles Fire)