चेन्नई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती पत्करलेला भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन नव्या वादाचे कारण ठरला आहे. नुकत्याच एका समारंभात अश्विनने हिंदी आपली राष्ट्रभाषा नसून केवळ अधिकृत भाषा आहे, असे विधान केल्यामुळे नवा वाद सुरू झाला आहे. (Ashwin)
चेन्नईमधील एका खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पदवीदान समारंभासाठी अश्विनला प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी, भाषण करण्यापूर्वी अश्विनने तुम्हाला कोणत्या भाषेत मला ऐकायला आवडेल, असे उपस्थित श्रोत्यांना विचारले. त्यावेळी त्याने इंग्रजीचा पर्याय देता समोरून खूप थोडे होकार आले. मग त्याने तमिळ भाषेचा पर्याय दिला. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अखेरीस अश्विनने हिंदीचा पर्याय दिला. मात्र, त्यावर समोरून काहीच प्रतिसाद आला नाही. तेव्हा, “मला हे स्पष्ट केले पाहिजे, ती केवळ आपली अधिकृत भाषा आहे. राष्ट्रभाषा नाही,” अशी टिप्पणी अश्विनने केली. (Ashwin)
अश्विनच्या या विधानामुळे हिंदी विरुद्ध प्रादेशिक भाषा या वादास पुन्हा तोंड फुटले आहे. सोशल मीडियावर अश्विनचा हा व्हिडिओ प्रचंड गाजत असून त्याच्याविरुद्ध व त्याच्या समर्थनार्थ अशा दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया देण्यात येत आहेत.
दरम्यान, भाजपचे तमिळनाडू प्रदेशाध्यक्ष के अण्णामलाई यांनी अश्विनच्या विधानास पाठिंबा दर्शवला आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही तो केवळ भाषिक दुवा होता, ती सोयीची भाषा आहे, असे अण्णामलाई म्हणाले. (Ashwin)
Tamil Nadu: Former off spinner Ravichandran Ashwin says, “…I thought I’d say it all. It’s (Hindi) not our national language; It’s an official language. Okay, anyway”
(09/01/2025) pic.twitter.com/bR47icWZEU
— IANS (@ians_india) January 10, 2025
हेही वाचा :