कोल्हापूर; प्रतिनिधी : माजी खासदार संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली असून त्यांच्या पक्षाला ‘सप्तकिरणांसह पेनाची निब’ हे चिन्ह मिळाले आहे. पक्षाचे नाव आता ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’ असे असणार आहे. (Sambhajiraje Chhatrapati)
संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati) यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली. ते म्हणतात, “९ ऑगस्ट २०२२ रोजी तुळजाभवानी मातेच्या साक्षीने आणि हजारो शेतकरी, कष्टकऱ्यांच्या साथीने स्थापन झालेली ‘स्वराज्य संघटना’ आता भारतीय निवडणूक आयोगाकडे ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’ या नावाने राजकीय पक्ष म्हणून अधिकृतपणे नोंदणीकृत झाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाला ‘सप्तकिरणांसह पेनाची निब’ हे चिन्ह मिळाले आहे.’’
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात माजी खासदार संभाजीराजे, आमदार बच्चू कडू , स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी एकत्र येत तिसरी आघाडी स्थापन केली आहे. तसेच विधानसभेच्या सर्व जागा लढण्याचे संकेत दिले आहेत.
आनंदवार्ता…!
स्वराज्य संघटनेचे सर्व कार्यकर्ते, चाहते व हितचिंतक तसेच तमाम महाराष्ट्रवासियांना कळविणेस अत्यंत आनंद होतो की,दि. ०९ ऑगस्ट २०२२ रोजी तुळजाभवानी मातेच्या साक्षीने आणि हजारो शेतकरी, कष्टकऱ्यांच्या साथीने स्थापन झालेली “स्वराज्य संघटना” आता भारतीय निवडणूक आयोगाकडे… pic.twitter.com/9hzkmXYegJ
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) October 1, 2024
हेही वाचा :