नवी दिल्ली : रशिया-युक्रेन युद्धात रशियन सैन्याकडून लढणाऱ्या केरळच्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्याच्यासोबत लढणारा त्याचा नातेवाईक गंभीर जखमी झाला आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे. (russia-ukraine-war )
बिनिल टीबी (३२) असे मृताचे नाव आहे. जैन टी. के. (२७) असे जखमीचे नाव आहे. दोघेही केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील वडक्कनचेरी येथील रहिवासी आहेत. आम्ही थकलो आहोत, आम्हाला पुढच्या फळीत लढण्यास भाग पाडले जात आहे, आम्ही भारतीय दूतावासाकडे अनेकदा विनंती केल्याचा दावा बिनिलने काही दिवसांपूर्वी पाठवलेल्या व्हॉइस मेसेज केला होता, असेही इंडियन एक्स्प्रेसने म्हटले आहे.
बिनीलच्या कुटुंबीयांना काही दिवसांपूर्वी, ड्रोनच्या हल्ल्यात दोघे जण जखमी झाले असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र कुटुंबीयांना त्याच्याशी संपर्क साधता आला नाही.(russia-ukraine-war )
सनीश हे या दोघांचे नातेवाईक आहेत. त्यांनी बिनीलची पत्नी जॉयसी मॉस्कोमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहे. तेथूनच तिला ही माहिती मिळाली. रशियन लष्कराकडून बिनिलचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्याचे दूतावासातील अधिकाऱ्याने तोंडी सांगितल्याचे ते म्हणाले.
तेथील केरळवासीयांसाठी काम करणाऱ्या NORKA ROOTS चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कोलासेरी म्हणाले, ‘आमच्या कानावर ही घटना आली आहे. आम्ही परराष्ट्र मंत्रालयाकडून अधिकृत पुष्टीकरणाची वाट पाहत आहोत. गेल्या काही महिन्यांपासून आम्ही या तरुणंना परत आणण्याचा प्रयत्न करत होतो. केरळमधील किती लोक अजून रशियन सैन्यात अडकले आहेत हे आम्हाला माहीत नाही. अशा घटना घडल्या की लोक कॉल करतात तेव्हाच आम्हाला घटनेची माहिती मिळते.’(russia-ukraine-war )
लढायला भाग पाडले जात आहे…
गेल्या काही महिन्यांपासून बिनिल आणि जैन टी. के. घरी येण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होते. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला, ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सतत व्हॉईस मेसेज केला होता. त्यात, मायदेशी येण्यासाठी ते सप्टेंबरपासून मॉस्कोमधील भारतीय दूतावासाचे दरवाजे ठोठावत आहेत, असे बिनिलने म्हटले होते. आम्हाला पुढच्या फळीत लढण्यास भाग पाडले जात आहे, त्यामुळे आमचे प्राण धोक्यात येऊ शकतात, असे बिनिलचे शेवटच्या संदेशात म्हटले होते.(russia-ukraine-war )
आम्ही थकलोय, मायदेशी परत यायचे आहे…
बिनिल इलेक्टीशियन म्हणून काम करत होता. ‘मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या, आम्ही थकलो आहोत. आम्ही आता युक्रेनच्या रशिया-व्याप्त अत्यंत धोक्याच्या प्रदेशात आहोत. आमचा करार एक वर्षाचा असल्याचे आमचे कमांडर सांगतात. म्हणून आम्ही सुटकेसाठी स्थानिक कमांडर्सना विनंती करत आहोत. जोपर्यंत रशियन सैन्य प्रतिसाद देत नाही तोपर्यंत आम्ही मदत करू शकत नाही, असे भारतीय दूतावासाचे मत आहे’ असा मेसेज बिनिलने केला होता, असे इंडियन एक्स्प्रेसने म्हटले आहे.
हेही वाचा :