महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : उद्यमशील करवीर नगरीची भुरळ उद्योगपती रतन टाटा यांना पडली होती. २०१३ साली इस्लामपूरला त्यांनी भेट दिली होती. त्यावेळी शिवाजी उद्यमनगरबद्दल त्यांना भेटलेल्या उद्योजकांच्या शिष्टमंडळांकडून त्यांनी माहिती जाणून घेतली होती. यावेळी रतन टाटा यांनी कोल्हापूरला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, त्यांची ही भेट अधुरीच राहिली. (Ratan Tata)
कोल्हापुरातील उद्योजकांनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. सांगलीतील आर. आय.टी कॉलेजच्या पदवीदान समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून १० नोव्हेंबर २०१३ ला उपस्थित होते. या समारंभासाठी सांगली आणि कोल्हापूरच्या अनेक लहान-मोठ्या उद्योजकांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली होती. यावेळी कोल्हापुरातील उद्योजकांची शिखर संस्था असलेल्या कोल्हापूर चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या शिष्टमंडळाने त्यांच्यासमोर समस्या मांडल्या होत्या. त्या सोडवण्यासाठी मी तुमच्यासोबत आहे, अशी ग्वाहीही टाटा यांनी शिष्टमंडळा दिली होती. तसेच त्यांनी कोल्हापूरच्या उद्योग क्षेत्राला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु, त्यांच्या निधनामुळे ही भेट अधुरी राहिली.
हेही वाचा :