श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील गगनगीर भागात रविवारी (दि.२०) रात्री दहशतवाद्यांनी नागरिकांवर हल्ला केला. या हल्ल्यात डॉक्टरसह सात जणांचा मृत्यू झाला. तर, ५ मजूर जखमी झाले. (Jammu and Kashmir)
केंद्र सरकारतर्फे चालविण्यात येणाऱ्या बोगदा प्रकल्पात सर्व कामगार काम करत होते. हल्ल्यानंतर लगेचच सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला. हल्लेखोरांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे. काश्मिरचे आयजीपी व्ही. के. बिर्डीही घटनास्थळी दाखल झाले होते. ज्या भागात दहशतवादी हल्ला झाला, तो भाग मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा मतदारसंघ असलेल्या गांदरबल विधानसभेत आहे. ते म्हणाले की, मी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि पीडितांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो. (Jammu and Kashmir)
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, देशाच्या विकासात योगदान देणाऱ्यांविरोधात हा हल्ला आहे. यापूर्वी १६ ऑक्टोबरला शोपियानमध्ये एका तरुणाची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
हेही वाचा :