महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : गाबा कसोटीतील भारताच्या पहिल्या डावात जसप्रीत बुमराह आणि आकाश दीप यांनी शेवटच्या विकेटसाठी महत्वाची भागिदारी केली. त्यांच्या या खेळीमुळे भारतीय संघाने फॉलोऑनचा धोका टाळला. भारताने पहिल्या डावात ९ फलंदाज गमावून २५२ धावा केल्या आहेत. तर, आकाश दीप २७ आणि जसप्रीत बुमराह १० धावांवर खेळत आहे.सामन्यात भारतीय संघ अजूनही १९३ धावांनी पिछाडीवर धावांनी मागे आहे. (IND vs AUS)
आकाश दीप-बुमराहची महत्वाची खेळी
चांगली फलंदाजी करणाऱ्या रवींद्र जडेजाच्या रूपाने भारताने २१३ धावांवर नववी विकेट गमावली. त्यामुळे भारतीय संघ पिछाडीवर पडेस अशी स्थिती निर्माण झाली होती. जडेजा बाद झाला तेव्हा भारताला फॉलोऑन वाचवण्यासाठी ३३ धावांची गरज होती. यानंतर महत्वाची खेळी करत बुमराह-आकाश दीप जोडीने संयमी खेळी करत १०व्या विकेटसाठी ३९ धावांची भागीदारी करून संघाला फॉलोऑनच्या पेचातून वाचवले. (IND vs AUS)
सामन्यात पावसाचा व्यत्यय
गाबा कसोटीत पावसाच्या व्यत्ययामुळे पहिला दिवस वाहून गेला. यासह सामन्यात अनेक वेळा पावसाच्या व्यत्ययामुळे सामना थांबवण्यात आला होता. उद्या (दि.१८) सामन्याच्या अखेरच्या दिवशीही पावसाचा अंदाज आहे. ऑस्ट्रेलियन हवामान विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, पावसाची शक्यता जास्त आहे, सकाळी आणि दुपारी पावसाची शक्यता आहे. सामन्याच्या शेवटच्या दिवशी ९८ षटकांचा खेळ असेल होणार आहे. सामन्यात विजयी होण्यासाठी ऑस्ट्रेलियाला भारताचा डाव गुंडाळावा लागेल. यानंतर आक्रमक फलंदाजी केल्यानंतर भारताच्या सर्व गडी बाद करावे लागतील.
कसे असेल ब्रिस्बेनमधील हवामान?
गाबा कसोटीच्या शेवटच्या दिवशीही पाऊस पडण्याची शक्याता आहे. त्यामुळे सामन्यात व्यत्यय आल्यास किंवा कमी षटके खेळली गेली तर, सामना अनिर्णित राहणे निश्चित आहे.
39*(54)
Jasprit Bumrah 🤜🤛 Akash Deep
Describe this partnership in one word ✍️😎#AUSvIND pic.twitter.com/CbiPFf2gBc
— BCCI (@BCCI) December 17, 2024
हेही वाचा :