कोल्हापूर : प्रतिनिधी : इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन प्रशांत कोरटकर या नावाच्या व्यक्तीने धमकी दिली आहे. या धमकीने खळबळ उडाली आहे. दरम्यान, प्रकाराच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले. त्यानुसार पोलिसांनी श्री. सावंत यांचा जबाब नोंदवला आहे. (Threat to sawant)
इंद्रजित सावंत यांनी स्वत: फेसबुकवर पोस्ट करुन धमकीची माहिती दिली आहे. दरम्यान प्रशांत कोरटकर हे नागपूरमधील पत्रकार आहेत. त्यांनी आपला आवाज वापरुन कुणीतरी धमकी दिल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे सावंत यांना धमकी कुणी दिली याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे असणार आहे.
इंद्रजित सावंत यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. तसेच त्यांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीची ऑडिओ टेपही फेसबुकवर टाकली आहे. फेसबुक पोस्टवर इंद्रजित सावंत यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे, “मा. मुख्यमंत्री यांचे नाव घेऊन प्रशांत कोरटकर नावाचा एक परशुरामी ब्राह्मण धमक्या देत आहे. मला अशा धमक्या नवीन नाहीत, पण या हरामखोरांचे शिवरायांच्या बद्दलचे विचार किती घाणेरडे आहेत, यांच्या पोटात श्री शिव छत्रपतींबद्दल काय विष भरलेले आहे हे झोपलेल्या मराठा बहुजनांना समजावे म्हणून हे रेकार्डींग व्हायरल करत आहे. या कोरटकर नावाच्या नागपूरच्या भिक्षूकालाच काय यांच्या बापालाही हा शिवरायांचा मावळा घाबरत नाही. जय शिवराय!!!” (Threat to sawant
इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकीचा फोन आला. डॉ. प्रशांत कोरटकर यांच्या नावाने इंद्रजीत सावंतांना शिविगाळ करण्यात आली. घरात घुसून मारण्याची धमकीही दिली आहे. समाजमाध्यमातून धमकीचे कॉल रेकॉर्डिंग सध्या व्हायरल होत आहे. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत हे ब्राह्मणद्वेष पसरवत असल्याचा फोन करणाऱ्या व्यक्तीचा आरोप आहे. (Threat to sawant
धमकी देणाऱ्या व्यक्तीने “तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका. लक्षात ठेवा महाराष्ट्रातील सरकार आणि ब्राह्मणांची मोठी ताकद आहे. शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधानमध्ये चेक करा. कोण ब्राह्मण होते ते कळेल. स्वतःची टीआरपी वाढवण्यासाठी करू नका. ब्राह्मणांची औकात काय आहे तुम्हाला दाखवू. तुम्ही जिथे म्हणाल तिथे येतो. कितीही मराठे एकत्र करा. छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचवणारा भालजी पेंढारकर हा पहिला ब्राह्मण होता, असा उल्लेख ऑडिओ टेपमध्ये आहे. संबंधित व्यक्तीने इंद्रजित सावंत यांना शिविगाळ केल्या आहेत.
हेही वाचा :