कोल्हापूर : प्रतिनिधी : हातकणंगले पुरवठा कार्यालयात चार हजार रुपयांची लाच घेताना दोघांना रंगेहाथ पकडले. लाच घेणारे दोघेही खासगी व्यक्ती आहेत. कार्यालयातच कारवाई झाल्याने महसूल विभागात खळबळ उडाली. सुभाष मधुकर घुणके (वय ३४, रा. यळगूड, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) आणि शैलेंद्र महादेव डोईफोडे (२२ रा. पेठ वडगाव, ता. हातकणंगले) अशी दोघांची नावे आहेत.(ACB Raid)
सुभाष घुणके हा हातकणंगले पुरवठा कार्यालयात कम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करतो. तो सरकारी कर्मचारी नसतानाही राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत प्राधान्य कुटुंब योजनेत नाव समाविष्ठ करण्यासाठी तक्रारदारांकडे चार हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने लाचेची रक्कम कमी करा, अशी विनंती केली असता घुणकेने वरच्या साहेबांना पैसे द्यावे लागतात, त्यामुळे पैसे कमी होणार नाही असे सांगून चार हजार हजार रुपयांच्या लाचेवर ठाम राहिला.(ACB Raid)
तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारकेली. तक्रारीची पडताळणी केली. सुभाष घुणकेने तक्रारदाराकडे तीन हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तडजोड करुन अडीच हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचल्यावर सुभाष घुणकेच्या सांगण्यावरुन तक्रारदारांकडून त्याला अडीच हजार रुपये लाच स्वीकारताना शैलेंद्र डोईफोडे याला पुरवठा कार्यालयात रंगेहाथ पकडण्यात आले.(ACB Raid)
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूरच्या पोलिस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस फौजदार प्रकाश भंडारे, पोलीस हवालदार विकास माने, संदीप काशीद, पोलीस नाईक सचिन पाटील, पोलीस कॉन्स्टेबल उदय पाटील, प्रशांत दावणे यांनी कारवाईत भाग घेतला.
हेही वाचा :