कोल्हापूर; प्रतिनिधी : सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाने पंचगंगेत उडी मारल्याची घटना शनिवारी (दि.२१) दुपारच्या सुमारास घडली. उडी मारलेल्या युवकाचा शोध महानगरपालिका अग्निशमन दल, त्याचे मित्र आणि नातेवाईक घेतला. अंधार पडल्यानंतर शोध मोहिम थांबवण्यात आली. (Kolhapur)
मित्र आणि नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार हर्षवर्धन विजय सुतार (वय २२ रा. राजोपाध्येनगर, कोल्हापूर) याने दुपारी सोशल मिडियावर मित्रासोबत घरच्या भांडणाला कंटाळून मी जीव देणार आहे असे सांगितले. मित्रांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न करत असताना त्याने पंचगंगेत उडी मारली. त्याच्या मित्रांनी पंचगंगेवरील पुलावर धाव घेतली. तिथे त्याची बुलेट मोटार सायकल मिळाली. या घटनेची माहिती कळताच पोलिस आणि नातेवाईकांनीही धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी नदी पात्रात त्याचा शोध घेतला. त्याच्या मित्रांनी नदी काठ धुंडाळला पण तो मिळून आला नाही.
हर्षवर्धन सुतार हा मुळचा करवीर तालुक्यातील वरणगे पाडळी असून सध्या तो राजोपाध्येनगर येथील मामांच्याकडे राहतो. त्याच्या आईचे निधन झाले असून वडिल वरणगे पाडळी राहतात. तो नागाळा पार्कातील एका महाविद्यालयात बीबीए च्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहे. त्याचा मित्र परिवारही मोठा आहे. आज दुपारी तो सोशल मिडियावर मित्रासमवेत बोलत असताना त्याने लाईव्ह करत पंचगंगेत उडी मारली. (Kolhapur)
हेही वाचा :